कोपर्डीचा 4 ऑगस्टला मुख्य युक्तीवाद

0

उज्वल निकम यांच्याबाबत 3 ऑगस्टला निर्णय

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोपर्डी प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांना तपासण्याची मागणी आरोपीचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपिठात अपिल केले आहे. त्यावर 3 ऑगस्ट रोजी निर्णय होणार असून कोपर्डी खटल्याची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. अशी माहिती अ‍ॅड. निकम यांनी दिली.

22 जुलै रोजी कोपर्डीची सुनावणी सुरू होती. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन, जेष्ठ पत्रकार, नाशिक फॉरेन्सीक लॅबचे अधिकारी अ‍ॅड. निकम यांच्यासह सहा जणांना आरोपीचे साक्षीदार म्हणून तपासण्याची मागणी संतोेष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी केली होती. त्याच बरोबर न्यायालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुलाखतीच्या सीडी दाखल केल्या होत्या. कोपर्डी खटल्याचे दोषारोपपत्र, वकील, साक्षीदार हे पुर्वनियोजीत असल्याचे आरोप आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे सहा साक्षीदार तपासण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, तो फेटाळल्यामुळे अ‍ॅड.खोपडे यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यावर काय निर्णय झाला हे सांगण्याचे आदेश आरोपी पक्षास देण्यात आले होते. मात्र त्यांनी विलंब करुन उच्च न्यायालयात एकही अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीच्या वकीलांना चांगलीच तंबी देऊन अंतीम संधी दिली होती. त्यावर अ‍ॅड. खोपडे यांनी उच्च न्यायालयात सहा साक्षीदार व सीडी दाखल करुन त्यांची साक्ष घेण्यास परवाणगी द्यावी असा अर्ज दाखल केला आहे. त्यावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी कोपर्डी खटल्याची महत्वपुर्ण अंतीम सुनावणी सुरू होणार आहे. हा खटला अंतीम टप्प्यात आल्यामुळे सर्व राज्याचे लक्षयाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

*