कोपरगावात मुलगा बोअरवेलमध्ये अडकला

0
कोपरगाव (प्रतिनिधी) – आजी-अजोबासोबत शेतात गेलेला 7 वर्षाचा प्रिन्स कुपनलिकेत पडला आहे. कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे आज दुपारी ही घटना घडली. प्रिन्सला बाहेर काढण्यासाठी ‘एनडीएफ’चे पथक बोलविण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात प्रथमच अशी घटना घडली.
साई प्रमोद बारहाते असे कुपनलिकेत पडलेल्या मुलाचे नाव आहे. आजी-अजोबासोबत तो शेतावर गेला होता. खेळता खेळता तो शेतातील कुपनलिकेत पडला. 15 ते 20 फुटावर तो अडकला आहे. साईला ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे. घटनास्थळी दोन पोकलॅन मशीन व रुग्णवाहिका पोहचली आहे.
साईला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून तो वरील आवाजाला प्रतिसाद देत आहे. कुपनलिकेभोवती बघ्यांची गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. आमदार स्नेहलता कोल्हे, माजी सभापती सुनील देवकर, तहसीलदार घटनास्थळी पोहचले आहेत. दुपारी उशिरापर्यंत साईला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

LEAVE A REPLY

*