कोठारेंच्या घरी येणार नवीन पाहुणा

0

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी आली आहे.

महेश कोठारे आजोबा होणार असून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे लवकरच आई होणार आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत उर्मिलाने ही गोड बातमी चाहत्यांना दिली.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये उर्मिलाचा बेबी बंप पाहायला मिळतोय. ‘आयुष्यातील या महत्त्वपूर्ण टप्प्याला मी एन्जॉय करतेय,’ असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे.

२० डिसेंबर २०११ रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती.

LEAVE A REPLY

*