कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरण : संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन

0

ज्येष्ठ कामगार नेते कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडला शुक्रवारी न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

२५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर समीरला जामीन देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करताना समीर गायकवाडला काही अटी घातल्या आहेत.

त्यानुसार समीरला त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जामीनकाळात त्याला निवासी पत्ता पोलिसांना कळवणे बंधनकारक असून तो महाराष्ट्राबाहेरही जाऊ शकणार नाही.

तसेच त्याला कोल्हापुरात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, समीरला दर रविवारी ११ ते २ या वेळेत विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून समीर पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, आता समीर गायकवाडला जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*