कॉपीमुक्त अभियानाला ठेंगा – इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांवर कॉप्यांचा पाऊस

0

जळगाव |  प्रतिनिधी :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या इयत्ता १२ वी च्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवित येत असले तरी शहरासह जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर कॉप्यांचा पाऊस पडला. त्यामुळे अभियानाला परिक्षार्थींनी ठेंगा दाखवल्याचे चित्र दिसून आले.
शिक्षण विभागाकडून बारावीच्या परीक्षांवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक उपाय योजना केली होती. यावेळी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यापूर्वी शिक्षकांकडून कसून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले.

मात्र विद्यार्थ्यांनी कसून तपासणी करुन देखील परीक्षेच्या वेळी वर्गातून कॉप्यांचा पाऊस पडत असल्याचे चित्र काही परीक्षा केंद्रांवर दिसून आले. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र  पोलिस बंदोबस्त असून देखील पोलिस कॉपी पुरवण्यासाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष करीत होते.

तर काही कॉपीबहाद्दर परीक्षा केंद्रांच्या आवारात धुमाकूळ घालत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली.  तसेच इंग्रजीचा पेपर झाल्याने विद्यार्थ्याना असलेले याविषयाचे असलेले दडपण काही प्रमाणात कमी झाले होते. त्याचप्रमाणे पहील्याच पेपरला कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा झाल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसून आले.

झेरॉक्स दुकाने सुरुच

परीक्षा काळात परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र शहरातील मू.जे. महाविद्यालय, नुतन महाविद्यालय, कन्या शाळा, बाहेती महाविद्यालय यासह अनेक ठिकाणी झेरॉक्सची दुकाने उघडीच असल्याने शिक्षण विभागाचे आदेशाची दुकान अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांची कसून तपासणी

इंग्रजीच्या पेपरने इयत्ता बारावीच्या पेपरांना आज पासून सुरुवात झाली. विद्यार्थी परीक्षा केंद्रात आल्यानंतर त्यांची परीक्षा केंद्राच्या गेटवर आणि वर्गात कसून तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना दिलेल्या सुचने प्रमाणे लेखन साहीत्य सोबत त्यांना वर्गांमध्ये सोडण्यात आले होते. मात्र कसून तपासणी करुन देखील परीक्षा केंद्रांवर सर्रासपणे कॉप्या सुरु असल्याने कॉपीमुक्त अभियान फेल झाले.

पालकांचा ३ तास ठिय्या

बारावीचा आज पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्याला सोडण्यासाठी व घेण्यासाठी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र काही पालक आपला पाल्य पेपर सोडवत असल्याने चक्क तीन तास परीक्षा केंद्राच्या बाहेर ठिय्या मांडून बसले होते.
कॉपीबहाद्दरांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
बारावीचा आज इंग्रजीचा पेपर असल्याने कॉपीबहाद्दरांकडून आपल्या संबंधित परीक्षार्थ्यांपर्यंत कॉपी पोहचविण्यासाठी कॉपी बहाद्दरांची कसरत सुरु होती. दरम्यान काही ठिकाणी गेट वर चढून तर काही ठिकाणी पत्र्यांच्या शेडवर चढून कॉपी पुरवविण्यासाठी धडपड करीत होते. मात्र परीक्षा केंद्रांवर तगडा पोलिस बंदोबस्त असून देखील पोलिसदादांनी कॉपी पुरवविणार्‍या कॉपीबहाद्दरांकडे दुर्लक्ष करीत होते.

खिडकीजवळच्या झाडाचा कॉपीला आधार

शहरातील उपद्रवीकेंद्र असलेल्या ऍग्लो उर्दू हायस्कूलमध्ये एका वर्गाच्या खिडकीजवळ झाड असल्याने विद्यार्थ्याने चक्क झाडाच्या फांदीचा  वापर हा कॉपी ठेवण्यासाठी केला असल्याने झाडाच्या फांदीने कॉपीला आधार दिला होता.

परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा पाऊस

परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करुन त्यांना वर्गात सोडण्यात आले. मात्र पेपर सुटल्यानंर परीक्षा केंद्रा बाहेर कॉप्यांचा पाऊस पडल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

*