कॉग्निझंटनंतर आता टेक महिंद्रानेही कर्मचाऱ्यांना काढले

0

काही दिवसांपूर्वीच विप्रो, कॉग्निझंट आणि इन्फोसिस या बड्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली होती.

त्यानंतर आता टेक महिंद्रानेही आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

त्यानुसार लवकरच कंपनीच्या तब्बल १५०० कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ देण्यात येणार आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या ‘एफआयटीई’ने कालच यावरून चेन्नई आणि हैदराबाद येथील कामगार आयोगाकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये कर्नाटक आणि कोईम्बतूरमधील कंपन्यांकडून तडकाफडकी करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
एकुणच सध्या कॉस्ट कटिंगच्या वाऱ्यांमुळे अनेकांच्या मानेवर टांगती तलवार आहे. यामध्ये वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ‘कॉग्निझंट’, ‘कॅपजेमीनी’, ‘इन्फोसिस’, ‘विप्रो’, ‘टाटा टेलिसर्व्हीसे’, ‘एअरसेल’, ‘स्नॅपडील’, ‘ली-इको’, ‘क्राफ्ट्स व्हीला’ आणि ‘यप मी’ या कंपन्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*