Type to search

जळगाव राजकीय

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई

Share

जळगाव | लोकसभा निवडणुकीनंतर बहुमतात आलेल्या भाजपात सध्या इनकमिंग जोरात असल्याने जिल्ह्यात फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशनापासून आघाडीवर असलेल्या एकेकाळच्या कॉंग्रेससह त्यांच्या सहकारी राष्ट्रवादी पक्षाला बालेकिल्लातच अस्तित्वाची लढावी लागत आहे, तर भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा विस्तारण्याचा प्रयत्न गेल्या दोन तीन वर्षापासून सुरु आहे. नुकत्याच महाजनादेश यात्रेअगोदर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव पासूनच सुरुवात करून युवकांना आपलेसे करण्याचा नवीन प्रयोगास सुरुवात केली आहे.

मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, के.डी.आबा.पाटील, मुरलीधर पवार, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या कॉंग्रेसच्या दिग्गजांनी कॉंग्रेसला २१ व्या शतकाच्या उंबरठयापर्यंत अच्छे दिन आणले होते. याच कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या गुणवंतराव सरोदे, एम.के.पाटील, उत्तमराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे खंबीर व विरोधी पक्षाचे नेतृत्वातून विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातुन कॉंग्रेस- राष्टवादीच्या आमदारांना सळो की पळो करीत हळूहळू आपले अस्तित्व वाढवत नेले.

जिल्हयात भाजपा शहरी तर ग्रामीण भागातून शिवसेनेच्या युतीने जनाधार घेत प्रत्येकी ५ व ६ असे ११ आमदार निवडून देत बहुमत सिद्ध करून सन १९९९ पर्यत सत्ता गाजवली होती. या कालखंडात जिल्हयात अनेक सिंचन प्रकल्पांना चालना दिली. यानंतर जिल्हयात कॉंग्रेसची पिछाडी होऊन राष्ट्रवादी केव्हा दमदार झाली हे कॉंग्रेसच्या नेत्यांना कळलेच नाही. याच कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई जिल्ह्यात मोठा प्रश्‍न असून शिवसेना मात्र ग्रामीण भागात सत्तेत सहभागी असलेले ना.गुलाबराव पाटील व जिल्हा बँकेत व्हा. चेअरमनपदी असलेले आमदार किशोर पाटलांसह मुक्ताईनगर परीसरातून चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातुन हळूहळू आपले अस्तीत्व विस्तारत असल्याचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!