Type to search

नंदुरबार

केशरी कार्डधारकांना शासनाकडूनच धान्य नाही

Share

तळोदा । श.प्र. – केशरी कार्ड धारकांना अन्नधान्य मिळावे याबाबत शिवसेनेने धडक मोर्चा काढून तक्रार केली होती. मात्र, अजून पावेतो केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करण्याचे आदेश दिलेले नाहीत, मात्र त्याच्या रोष दुकानदारावर काढला जात आहे, त्यात आमचा काहीही दोष नसून दुकानदारांना वेठीस धरण्यास येऊ नये, या मागणीचे निवेदन रेशन दुकानदार संघटनेने तहसीलदारांना दिले आहेत.

तळोदा तालुका शहर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने शिवसेनेच्या मोर्चानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि.20 जून रोजी शिवसेनेकडून तळोदा शहरात केशरी कार्ड धारकांचा मोर्चा निघाल्यानंतर तक्रारी निवेदन देण्यात आले आहे. मात्र शासनाने अजून पावेतो केशरी कार्ड धारकांना अन्न पुरवठा करण्याचे आदेश दिलेले नाही. कार्ड धारकांचा रोष मोर्चाद्वारे व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यात आमचा काहीही दोष नाही. दुकानदारांना वेठीस धरण्यास येऊ नये, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदार शासनाचे आदेशान्वये दररोज दुकान उघडे ठेवतो व दिलेल्या परिमाणानुसार धान्य वाटप पाँश मशीन द्वारे 80 टक्के ते 98 टक्के पर्यंत वाटप करीत असतो.

अंत्योदय, पी.एच.एच. लाभार्थी कार्ड धारकांची कुठलीच तक्रार नसून आम्ही आदेशाचे पालन चोखपणे पार पाडीत असतो. जनतेची सेवा म्हणून आम्ही अत्यंत कमी मानधनावर काम करीत असल्याचे निवेदनात म्हटले असून तहसीलदार यांना सदर निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनावर शानुबाई वळवी, श्रावणगीर गोसावी, पोपटलाल माळी, उध्दव पिंपळे, दिलीप टवाळे, बडा दादा दुध उत्पादक सहकारी संस्था, पी.व्ही.चौधरी, के. एम. पारधी, वाय.पी.सोनवणे, बी.एस. राणे, आय. डी.पाडवी, आदींच्या सह्या आहेत.ऑनलाइमुळे पारदर्शकता आली आहे. किंटलोगण धान्य पुरवठा विभागाकडे उरत आहे. सदर धान्य वितरणासाठी पुन्हा सर्वे होऊन केशरी कार्ड धारकाचा पदरात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिधापत्रिका धारकाना आधार नोंदणी करून ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. अद्यापही अनेकजण या प्रक्रियेपासून वंचीत आहे. जे ऑनलाइन झालेले आहेत. त्या प्रत्त्येकास शासनाकडून धान्य मिळेलच असे नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!