केरळ मधील हिंसेचा नाशकात निषेध

0

नाशिक : गेल्या काही वर्षापासुन केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डावे पक्ष हिंसाचार घडवून आणत आहेत. केरळमधील डाव्या पक्षांच्या हुकूमशाहीविषयी देश अनभिज्ञ आहे. केरळमध्ये संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराची झळ बसत असून बारा कार्यकर्त्यांची हत्त्या करण्यात आली आहे. या हिंसेचा निषेध करण्यासाठी आणि हत्यांचे हे सत्र थांबवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश्वव्दारासमोर प्रबोधनमंचच्या वतिने निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना या हल्ल्यांबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे. की,आठ महिन्यांआधी केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आले. मात्र, या आठ महिन्यात केरळातील हिंसाचारात लाखोंच्या संख्येने वाढ झाली आहे. येथील गुन्हेगारीचे प्रमाण दररोज वाढत आहे. प्रत्येक व्यक्ती हा डाव्यांच्या दहशतीखाली जगतो. सरकारकडून जनतेवर सातत्याने अन्याय करण्यात येतो.

मात्र, भीतीमुळे लोक गुन्हा नोंदवायलाही घाबरतात. महिलांवरील हिंसाचारातही वाढ झाली. याची संख्याही मोठी असून अल्पवयीन मुलींवर डावे अत्याचार करीत आहेत. डाव्या विचारसरणीने सुरू केलेले हे कृत्य लोकशाहीच्या विरोधात आहे. संघ,भारतीय जनता पार्टिआणि संघ प्रेरीत अन्य संघटनांच्या जवळपास 250 कार्यकरत्यांची हत्या झाली आहे. या सर्व हिसांत्मक घटनांचा प्रबोधन मंच,आरएसएस संघटनेकडुन निषेध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

तसेच या अमानवीय हत्यांची कठोर शब्दात निंदा करत अशा घटना भविष्यात होऊ नये या संबंधी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी मंचचे संजय कुलकर्णी, कैलास साळुंखे, नगरसेवक दिनकर पाटील, विजय कदम, प्रकाश भिडे, रमेशराव गायधनी , एकनाथ शेटे , विनित महाजन ,अरुण पवार,अ‍ॅड.मिनल भोसले. पंकज वाकदकर आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

*