केरळमध्ये स्वाइन फ्लूचे ४० बळी

0

केरळमध्ये गेल्या चार महिन्यांत स्वाइन फ्लूने चाळीस बळी घेतले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली.

या वर्षी जानेवारीपासून २३४९ लोकांची एच १ एन १ विषाणूच्या संसर्गाबाबत चाचणी करण्यात आली, त्यात ५०० जणांची चाचणी सकारात्मक आली असून, आतापर्यंत चाळीस जण मरण पावले आहेत, असे त्यांनी राज्यात एच १ एन १सह अनेक प्रकारच्या संसर्गानी तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याबाबत दाखल केलेल्या प्रस्तावावर सांगितले.

विविध प्रकारच्या तापाच्या साथी रोखण्याचे प्रयत्न सरकार करीत असून, त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे.

सर्व सरकारी रुग्णालयात औषधे उपलब्ध आहेत. जे लोक एच १ एन १ विषाणूने मरण पावले त्यांना इतरही रोग झाले होते असे शैलजा म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*