केदार शिंदेंचा नवा चित्रपट ‘रायबाचा धडाका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

0

तेलंगणातील हैद्राबादस्थित तेलगू चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या श्री विजयासाई प्रॉडक्शनने आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे ठरवले आहे.

त्यांनी यासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांची निवड केली आहे.

‘रायबाचा धडाका’ असे या चित्रपटाचे नाव असून ‘लवासा’, ‘आळंदी’, ‘मुंबई’, ‘ठाणे’, ‘पुणे’ इत्यादी शहरांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.

‘रायबाचा धडाका’ या चित्रपटातून आल्हाद अंडोरे आणि राधिका या दोन नव्या कलाकारांचे पदार्पण होणार आहे.

रायबा आणि शुभ्रा यांच्या प्रेमाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. अत्यंत हलकीफुलकी मनोरंजनप्रधान कौटुंबिक अशी ही गोष्ट आहे. रायबा आणि शुभ्रा ही नवी जोडी या चित्रपटामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाला फ्रेश लूक देण्यासाठी अत्यंत देखणी आणि ग्लॅमरस जोडीची निवड करून या निर्माता दिग्दर्शक मंडळींनी यशस्वी वाटचाल केली आहे.

प्रसिद्ध डीओपी सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी आणि पंकज पडघम यांचे श्रवणीय संगीत ही आणखी एक या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

LEAVE A REPLY

*