केडगावात कापड दुकानात चोरी

0

केडगाव (वार्ताहर) – केडगाव उपनगरातील शिंगवी कापड दुकान व बिल्डींग मटेरियल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी हातसफाई केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोपटलाल माणिकचंद शिंगवी यांनी पोलिसंाकडे तक्रार दिली आहे. शिंगवी यांचे केडगावातील नेप्ती रस्त्यावर कापड दुकान आहे.नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा शटर उघडे असल्याचे त्यांना दिसले. दुकानातील गल्ल्यातून 35 हजार रुपयांची रोकड व कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

दुसरी चोरी नगर-पुणे रस्त्यावरील बिल्डींग मटेरियल दुकानात झाली. ज्ञानेश्‍वर विठ्ठल कोतकर यांचे पुणे रस्त्यावर बिल्डींग मटेरियलचे दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली.

LEAVE A REPLY

*