केंद्र सरकारने एअर इंडियाचे ४५१ कोटी रुपये थकवले

0

केंद्र सरकारने एअर इंडियाचे तब्बल ४५१ कोटी रुपये थकवले आहेत.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींना पुरवण्यात आलेल्या विमानांचा खर्च अद्याप केंद्र सरकारने अद्याप एअर इंडियाला दिलेला नाही.

यासोबतच विशेष मोहिमांसाठी एअर इंडियाने सेवा उपलब्ध करुन दिल्यानंतरचे बिलदेखील केंद्र सरकारने थकवले आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

सेवानिवृत्त कमोडोर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रपतींच्या सेवेत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा २७.७० कोटी इतका खर्च अद्याप देण्यात आलेला नाही.

उपराष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सेवेचे ३५१.८२ कोटी थकले आहेत, तर पंतप्रधानांच्या सेवेचे ४५.९७ कोटी रुपये थकवण्यात आले आहेत.

परदेशी शिष्टमंडळाच्या प्रवासाचे १४.६६ कोटी रुपये थकले आहेत.

आपत्कालीन सेवेसाठी झालेला ११.५९ कोटींचा खर्चदेखील अद्याप एअर इंडियाला देण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

*