केंद्र सरकारकडून ‘न्यूटन’ला ऑस्करसाठी १ कोटी रुपयांचे अनुदान

0

देशभरातील चित्रगृहांत शुक्रवारपासून ‘न्यूटन’ प्रदर्शित झाला आहे.

निवड समितीने ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट म्हणून ‘न्यूटन’ची निवड झाल्याची घोषणा केली.

दरम्यान, या चित्रपटासाठी केंद्र सरकारने १ कोटी रुपयांचे अनुदान जाहिर केले आहे. एका चांगल्या आणि आशयप्रधान चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान देण्यात आल्याचे, निवड समितीचे अध्यक्ष सी व्ही रेड्डी यांनी म्हटले.

एकूण २६ चित्रपटांमधून ‘न्यूटन’ या चित्रपटाला ‘ऑस्कर’साठी पाठवण्याचा निर्णय ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड समितीने घेतला. या चित्रपटांमध्ये १२ हिंदी, ५ मराठी, तेलगू, कन्नड, बंगाली, मल्यालमधील प्रत्येकी दोन आणि एका तमिळ चित्रपटाचा समावेश होता.

LEAVE A REPLY

*