केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांची लष्करी योजनांच्या बाबतीत गुप्तता कायम

0

श्रीनगर येथे जीएसटीच्या मुद्द्यारुन आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीसाठी केंद्रीय संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले, ‘काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’

यावेळी काश्मीर खोऱ्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता मेहबूबा मुफ्ती यांची मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडी करण्याच्या काही शक्यता आहेत का? असं विचारलं असता ‘मला याबद्दल काहीच कल्पना नसून मी त्याबद्दल काहीच ऐकलंही नाहीये’, असे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर हे उत्पादन (वस्तूंची निर्मिती) करणारे राज्य नाही. तर, ते वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणारे राज्य आहे आणि जीएसटी करप्रणालीसुद्धा वस्तू- सेवा कर यावरच आधारलेली आहे. त्यामुळे या राज्यामध्ये ज्या वस्तूंच्या निर्मितीवर कर लावण्यात येत नाही त्या वस्तूंच्या सेवांवर कर लावण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लष्करपमुख बिपिन रावत यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषा या विषयीही जेटलींनी चर्चा केली. याविषयी अधिक माहितीचा उलगडा न करता त्यांनी काही लष्करी योजनांच्या बाबतीत गुप्तता राखण्यालाच प्राधान्य दिलं.

LEAVE A REPLY

*