कॅम्पातील ‘त्या’महिलेचा पतीनेच केला खून

0

नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात दिनांक ९ मार्च  रोजी एक तरुण महिला योगिता नवनाथ काळे राहणार सासर लहावीतगाव हिने गळफास घेतल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.

या घटनेत सदर महिलेच्या नवऱ्याने पोलीस येईपर्यंत वाट न बघता तिची बॉडी खाली काढून ठेवली होती. या कारणावरून पोलिसाचा संशय बळावला आणि तपास सुरु झाला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी नवरा नवनाथ काळे याने  चरित्रचा संशय घेऊन तिला गळा आवळून मारले असल्याचे काबुल केले.

या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. मयत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून क्र १५/१७ वरून भा द वि ३०२ दाखल केला आहे. पोस्टमॉर्टेम मध्येही गळा आवळ्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

*