Type to search

कॅन्सरबद्दल गैरसमज

आरोग्यदूत

कॅन्सरबद्दल गैरसमज

Share

बर्‍याचशा भागातील कॅन्सर असलेल्या रोग्याचा सुरुवातीचा महत्त्वाचा वेळ योग्य उपचाराविना वाया जात असल्याने रोग पहिल्या पायरीत असताना फारच कमी रुग्णांचे उपचार सुरू होतात. बहुतेक रोग्यांचे उपचार रोग दुसर्‍या अथवा तिसर्‍या पायरीत पोहोचल्यानंतर सुरू होतात. रोग पहिल्या पायरीत असताना रोग्यांना उपचारांपासून शंभर टक्के फायदा होतोच. परंतु, रोग दुसर्‍या व तिसर्‍या पायरीपर्यंत पोहोचल्यावर मात्र रोग्याचे आयुष्य योग्य उपचार घेऊनही रोगाच्या प्रमाणानुसार नंतरच्या काळात घटते.

कर्करोगाबद्दल गैरसमज
1) कर्करोग एकदा झाल्यावर कधीही दुरुस्त होऊ शकत नाही. कर्करोग जर प्राथमिक अवस्थेत असताना लगेच ओळखला गेला व वेळीच त्यावर योग्य उपचार झाले तर हा रोग खचितच बरा होतो. परंतु, नेमके बर्‍याच वेळा असे होत नाही. कर्करोगाचा रोगी बर्‍याच वेळा तज्ञ डॉक्टरांपर्यंत उशीरा पोहोचतो अथवा वेळीच पोहोचल्यावर त्यांचा सल्ला मानत नाही. त्यामुळे हा रोग नंतरच्या अवस्थेचे रुप वेगाने धारण करतो. रोग वाढल्यामुळे निर्माण होणार्‍या त्रासामुळे रोगी उपचार करून घेण्याबद्दल मनाने गंभीर बनतो. एव्हाना योग्य वेळ निघून गेलेली असते. असे उशिरा निदान झालेले वा उशिरा उपचार करणारे रोगी बर्‍याच प्रमाणात आढळतात. हे रोगी नंतर काही काळात दगावतात म्हणून अशा प्रकारे गैरसमज निर्माण झालेला असतो.

2) कर्करोग झाल्यावर मरण लवकरच अटळ असते म्हणून उपचार करून पैशांचा अपव्यय करू नये, हा गैरसमज वरच्या गैरसमजातून बळावतो. कर्करोग म्हणजे मरण हा गैरसमज लोकांच्या मनात वरच्या परिच्छेदात सांगितलेल्या कारणांनी पक्का रुळला आहे. वास्तविक वेळीच उपचार केले तर मृत्युला परत पाठविणे. आधुनिक उपचारांनी शक्य असते.

3) घरात म्हातार्‍या लोकांना कॅन्सर झाल्यास वयस्कर व्यक्तींना देखील हा रोग आपणामध्ये संसर्गाने अथवा अनुवंशाने निर्माण होईल, अशी भीती वाटावयास लागते. त्यामुळे या रोग्याचे नातेवाईक काही वेळा विविध डॉक्टरांकडे स्वत:ला कर्करोग तर झालेला नाही ना, या शंकेचे निरसन करण्यासाठी फिरत असतात. कर्करोग संसर्गजन्य रोग नाही. अथवा अनुवंशिक रोग नाही. म्हणून आपल्या घरात कर्करोग झाल्यास आपणासही तो रोग होऊ शकतो अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. फारच कमी प्रकारचे कर्करोग हे फारच क्वचितवेळा अनुवंशिकपणे निर्माण होतात.

4) गळ्यात कोणतीही गाठ निर्माण झाल्यास ती कॅन्सरचीच असते हा गैरसमज रोगाबद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण होतो. बर्‍याचवेळा घरातील, नात्यातील वा ओळखीची वडील व्यक्ती अशाप्रकारे सहज बोलून जातात. त्यामुळे इतरांच्या मनात हा गैरसमज वाढतो.
डॉ. प्रमोद महाजन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!