कृष्णापुरी तांड्यात विवाहितेवर बलात्कार

0

चाळीसगाव |  प्रतिनिधी :  तालुक्यात कृष्णापुरी ताडा येथे २३ वर्षीय विवाहितेवर तीन नराधमानी बलजबरीने बलात्कार केला आहे. हि घटना दि.२६ रोजी घडली असून याप्रकरणी पोलीस स्टेशनला आधि विनयभंगचा गुन्हां दाखल करण्यात आला होतो. दि.३० रोजी बलात्काराचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

कृष्णापुरी ताडा येथील २३ वर्षीय विवाहिता ही स्वता;च्या शेतात काम करीत असताना, ताडयातीलच विनोद काशीनाथ जाधव, तालीब मच्छिद्र जाधव व योगेश शिवाजी जाधव ह्या तिघांनी तिला पिकांत ओढत नेले व तिचे तोंड दाबुन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

तसेच तिला धमकावत तिच्या पती व सासर्‍याला जिवेमारण्यांची आणि तिला विहीरीत फेकूण देण्यांची धमकी दिली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला सुरुवातीला भादवी कलम ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हां दाखल करण्यात आला होतो.

विवाहितेची आई तिला भेटण्यांसाठी आल्यानतंर विवाहितेने तिच्यावर झालेल्या अत्याचारी विषयी माहिती आईला सांगीतल्या नतंर, मेहुणबारे पोलीस स्टेशनला भादवीकलम ३७६ प्रमाणे गुन्हां नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

*