कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना साहित्याचे वाटप

0
नवापूर / येथील पंचायत समितीच्या कृषि विभागामार्फत शेतकर्‍यांना विविध साहित्यांचे वाटप जि.प.अध्यक्षा सौ.रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत दारिद्र रेषेखालील शेतकर्‍यांना त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देेशाने अर्थसहाय्य योजनेंतर्गत संबंधित शेतकर्‍यांना शेती सुधार व उत्पन्न वाढीकरिता विविध प्रकारच्या 13 बाबींकरिता 50हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येते.
या बाबतचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शेतकर्‍यांना विविध साहित्यांचे जि.प अध्यक्षा सौ.रजनीताई नाईक व पं.स. सभापती सौ.सविता गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी उपसभापती दिलीप गावीत, जि.प. सदस्या सौ.मायावती गावीत, जि.प. सदस्य रतन गावीत, पं.स. सदस्य जालमसिंग गावीत, विजय गावीत, सरपंच बाबल्या गावीत, सुमन गावीत, प्रभु कोकणी आदी उपस्थित होते.

यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.रजनीताई नाईक यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकर्‍यांचे जीवमान उंचवावे अशी अपेक्षा आमची आहे.

शेतकरी सधन व सुखी झाला पाहिजे. या योजनेत जमीन सुधारणा, निविष्ठा, सुधारित शेती अवजारे/पिक संरक्षण आयुधे, बैलजोडी, बैलगाडी, पाईप लाईन संच, नवीन विहीर अनुदान मर्यादा 1 लाख रुपयांमध्ये विहिर दुरुस्ती करणे, इलेक्ट्रिक पंप/ऑईल इंजिन, ठिबक/तुषार सिंचन, पारस बाग, शेततळे तसेच आदिवासी उपयोजना सन 2015 ते 16 अंतर्गत 448 लाभार्थीची निवड करण्यात आली होती.

उपरोक्त सर्व लाभार्थ्यांनी मंजुर 12 बाबींपैकी बैलजोडी या बाबीची मागणी केल्यास्तव सर्व लाभार्थींप्रती लाभार्थी 30 हजार रक्कम मर्यादित प्रमाणे बैलजोडी खरेदी करण्यात आलेली आहे.

त्यांचे खरेदी बाबतचे अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर आर.टी.जी.एस.ने वर्ग करण्यात आलेले आहे. सदर रक्कम वजा जाता शिल्लक 20 हजार रुपयाचा रकमेची स्प्रे पंप नग 1, बहु उद्देशीय कल्टीव्हेटर, एच.डी. पी.इ.पाईप असे आहेत.

सदर बाबींचा लाभार्थ्यांना लाभ देऊन स्वयंपुर्ण व्हावा हा या योजनेचा उदेश आहे. सर्व आदिवासी उपयोजना सन 2015 ते 16 अंतर्गत 448 लाभार्थी निवड झालेल्या लाभार्थ्यानी आपणास मिळालेल्या साहित्याचा स्वत:च्या शेत जमिनीवर जास्तीत जास्त वापर करुन स्वतःच्या उत्पन्नात भरघोस वाढ करावी असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

*