कृषी महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया दोन महिन्यांपासून खोळंबली

0

भानसहिवरा (वार्ताहर)- राज्यातील कृषी महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया कुठलेही ठोस कारण नसताना दोन महिन्यांपासून खोळंबली असून त्यामुळे पालकांबरोबरच विद्यार्थीही चिंताग्रस्त बनले आहेत.

 

 

कृषी महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया कुठलेही ठोस कारण नसताना दोन महिन्यांपासून खोळंबली आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त असून विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

 

 

प्रवेश प्रक्रिया राबविणारे पुण्याचे कॉम्प्युटर सेंटर (केपीटीएल)ची अनास्था व कारभारातील वेळकाढूपणा यास कारणीभूत आहे. स्थगिती उठविणे तातडीचे काम होते. तथापि तसे घडले नाही. कृषी परिषद पुणे यांनी याबाबत तांत्रिक बाबींचा परामर्श घेणे आवश्यक आहे.

 

 

पीसीएम व पीसीबी दोन्ही ग्रुप चालतात. त्याचबरोबर कॉम्प्युटर सेंटरवाल्यांच्या अज्ञानामुळेही अनेक विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फटका बसला असल्याची पालक व विद्यार्थ्यांत चर्चा होत असून ही खोळंबलेली प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

 

 

विद्यार्थी बारावीच्या परीक्षेनंतर तीन महिन्यांपासून घरी बसून आहेत. इतर मेडिकल व इंजिनिअरींगची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून कॉलेजेस सुरू झाली आहेत. कृषी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कृषी मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*