‘कृषीथॉन’ प्रदर्शनला उद्यापासून प्रारंभ

0

नाशिक | दि. २१ प्रतिनिधी
कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या १२ व्या राष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनचा शुभारंभ गुुरुवारी (दि.२३) होत आहे. उद्घाटन समारंभ सकाळी साडेदहा वाजता ठक्कर डोम येथे राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर आणि विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

कृषी संंबंधीत माहिती, ज्ञान, अभिनवता आणि व्यवसायिकता या चतु: सुत्रीवर आधारीत ‘कृषीथॉन’ मध्ये यंदा अनेक नवीन उपक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर आणि साहिल न्याहरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन समारंभाला खा. हरिश्‍चंद्र चव्हाण, खा. हेमंत गोडसे, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. निर्मलाताई गावित, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक दिलीप झेंडे, विजू मविप्र सरचिटणीस निलिमाताई पवार यांची उपस्थिती असणार आहे.

युवा वर्गासाठी कृषी व्यवसाय अशी संकल्पना असलेल्या प्रदर्शनात ३५० कंपन्यांचा सहभागी होणार असून नर्सरी उद्योजकांची परिषद यावर्षी प्रथमच होणार आहे.विविध कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाला असणार्‍या तसेच कृषी विस्तार, संशोधना बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणार्‍या उपक्रमशील विद्यार्थ्यास ‘गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ३७ संस्था आणि गावे यांनाही यावेळी सन्मानियत करण्यात येणार आहेे.

देशासह विदेशातील कृषी तंत्रज्ञानाची माहिती येथील शेतकर्‍यांना व्हावी यासाठी इस्त्राईल येथील कंपन्यांच्या स्टॉलचा समावेश असणार आहे.. सोमवार(दि.२७) पर्यत सुरु असणार्‍या या प्रदर्शनात शेतीविषयक विविध विषयावरील परिसंवाद आणि चर्चासत्र पुरस्कार वितरण, कृषी करिअर जत्रा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. राज्यसह गुजरात येथील सुमारे दोन लाखाहून अधिक शेतकरी प्रदर्शनात भेट देतील असा अंदाज आहे.

असे होतील कार्यक्रम

गुरुवार (दि. २३) : कृषीथॉन युवा सन्मान,परिसंवाद : कृषी क्षेत्रातील शासनाच्या विविध योजना
शुक्रवार (दि. २४): राज्यस्तरीय नर्सरी उद्योग परिसंवाद, परिषद चर्चासत्र : डाळिंब शेती-उत्पादन ते काढणी पश्‍चात तंत्रज्ञान
शनिवार (दि.२५):परिसंवाद-राज्यस्तरीय दुग्ध व्यवसाय, कृषी क्षेत्र विकासात कृषी कंेंद्राचे स्थान, बी टू बीटस् :कृषी क्षेत्रातील व्यवसायिकांना चालना देणारा उपक्रम.
रविवार (दि.२६) : कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार. आदर्श जलसंवर्धक पुरस्कार, कृषीपूरक जोडउद्योग तसेच द्राक्ष शेती-गुणवत्तापूर्ण उत्पादन ते काढणी पश्‍चात तंत्रज्ञान परिसंवाद व चर्चासत्र..
सोमवार (दि.२७) : ऍग्रो करिअर जॉब फेअर

LEAVE A REPLY

*