Type to search

नंदुरबार

कृषिदूतांमार्फत जागतिक कृषी दिन साजरा

Share

धडगांव। येथे शहादा येथील के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धडगाव येथील सातपुडा शिक्षण मंडळ विद्यावाडी धुळे संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अक्राणी येथे कृषीदिन साजरा करण्यात आला.

कृषिदिनाचे औचित्य साधून कृषिदूतांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. त्याचप्रमाणे गावातून विद्यार्थ्यांसमवेत वृक्षदिंडी काढण्यात आली. कृषिदूतांनी मानवी जीवनातील वृक्षांचे महत्व स्पष्ट करत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी चोंदवाडे बु। जाफिपाडा गावातील कृषिदूत जयेश पाटील, ऋषीकेश वरुडे, स्वप्नील डोंगरे, अभिजित पानपाटील, उन्मेश अहिरराव, शिवासाई रेड्डी, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जि.प. शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना एक एक वृक्ष सोपविले.

ज्याच्या त्याच्या वृक्षाची पाहणी स्वतः विद्यार्थी करतील अशी माहिती व वृक्षाचे महत्व काय असते हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. कृषिदूत जयेश पाटील, ऋषीकेश वरुडे, स्वप्नील डोंगरे, अभिजित पानपाटील, उन्मेश अहिरराव, शिवा साई रेड्डी यांनी गाव पाड्यात वृक्षदिंडी काढून कृषीदिन साजरा केला. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!