कृउबामध्ये टमाटर विक्रीसाठी  नेेणार्‍या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

0
जळगाव | प्रतिनिधी :  टोमॅटो विक्रीसाठी ऍपेरिक्षाने जळगावातील कृउबामध्ये किनोद करंज येथील शेतकरी येत होता. यावेळी शिवाजीनगर उड्डाणपूलावरील क्रॉसबार डोक्याला लागल्याने तरुण शेतकर्‍याचा करुण अंत झाला. ही दुर्देवी घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमूळे संपूर्ण करंज गावावर शोककळा पसरली.
महेंद्र निंबा धनगर (वय २०, रा.धनगरवाडा, करंज) हे मृत्यू तरुणाचे नाव आहे. वडिल निंबा वामन धनगर, आई मालुबाई व मोठा भाऊ संदीप यांच्यासह महेंद्र करंज येथे राहतो. तीन ते चार बीघे शेतजमीन असल्याने यामध्ये टोमॅटोसह अन्य भाजीपाल्या त्यांनी लावला आहे.
टोमॅटोचे भाव पडले असतांनाही माल सडण्यापेक्षा विकला बरं असे म्हणून धनगर परिवाराने टोमॅटोची तोडणी करुन जळगावात विक्रीसाठी महेंद्र याला पाठविले. जीवाला जीव लावणार्‍या रिक्षाचालक मित्र योगराज आत्माराम पाटील (रा. कठोरा) याच्या ऍपेरिक्षा क्रमांक (एम. एच. १९ एस ९७४२)ने जळगाव टोमॅटो घेवुन येत होते.

LEAVE A REPLY

*