कुलभूषण जाधव हे अजमल कसाबपेक्षा मोठे दहशतवादी : मुशर्रफ

0
कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेला आदेश मान्य करणे पाकिस्तानमध्ये अनेकांना जड जात आहे. याला पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफही अपवाद नाहीत.
भारतीय नागरीक कुलभूषण जाधव हे अजमल कसाबपेक्षा मोठे दहशतवादी आहेत असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केले आहे.
मुशर्रफ सध्या पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करत आहेत.
कसाब फक्त एक प्यादा होता. पण जाधव दहशतवादाला खतपाणी घालत होते. त्यांनी घातपात घडवून पाकिस्तानात अनेकांना ठार मारले असते असा आरोप मुशर्रफ यांनी एआरवाय न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवून सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली आहे.

LEAVE A REPLY

*