कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये पाकिस्तान उभी करणार नव्या वकिलांची टीम

0

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारला आपल्या देशात चहूबाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे.

विरोधी पक्ष, नागरिकांकडून होणा-या या टीकेची धार कमी करण्यासाठी म्हणून पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात वकिलांची नवी टीम उभी करण्याचा विचार करत आहे.

नवी टीम आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानची बाजू भक्कमपणे मांडेल असे सरताज अजिज यांनी सांगितले.

अजिज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार आहेत.

भारताने दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम निकाल देईपर्यंत आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

LEAVE A REPLY

*