कुर्‍हा येथे शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

0

मुक्ताईनगर | वार्ताहर :  तालुक्यातील कुर्‍हा येथील स्व.अशोक ङ्गडके माध्यमिक विद्यालयात एका शिक्षकाने अकरावीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास अद्याप पर्यंत अटक करण्यात आले नाही.

मुक्ताईनगर पोलीसात पिडीताने स्वत: दिलेल्या ङ्गिर्यादीनुसार कुर्‍हा येथील स्व.अशोक ङ्गडके माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचा शिक्षक निलेश घोपे हे इयता ११ वीच्या वर्गासही अध्यापनाचे कार्य करतो. एक महिन्यापासून इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थीनीचा नकार असतांनाही सदर निलेश घोपे या शिक्षकाने वेळोवेळी तसेच दि.३० मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता इयत्ता ११ वीच्या वर्गात लग्नाबद्दल विचारून वाटेल असे कृत्य केले.

यावरून निलेश नामदेव घोपे या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.तपास सपोनि हेमंत कडुकार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*