कुटूंबाची रेल्वेसमोर उडी

0

जळगाव । येथील रेल्वेस्थानकावर मध्यरात्री सिंधी कॉलनीत राहणार्‍या माता-पित्याने मुलासह भरधाव रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला असून आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना फलाट क्रमांग दोन वर घडली. यानंतर अर्ध्या तासातच आणखी एका दाम्पत्यामध्ये वाद झाल्याने विवाहितेने रेल्वेरूळावर उडी घेतली. ही घटना फलाट क्रमांक तीन वर घडली. मात्र, प्रवाशांनी वेळीच या विवाहितेला सुरक्षीत फलाटावर आणून तिच्या पतीला चोप दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज मध्यरात्री 1.05 वाजता फलाट क्रमांक 2 वर सिंधी कॉलनीत राहणारे सूनील तुलसीदास कावना(वय-33), सौ.किर्ती सूनील कावना(वय-27), मुलगा यश(वय-6 वर्ष) हे कुटूंब फिरत होते. भुसावळ-सुरत रेल्वेची वेळ झाल्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान, याचवेळी सुपरफास्ट रेल्वेगाडी हबिबगंज-कुर्ला जळगाव स्थानकावरून जात असल्याची उद्घोषणा करण्यात आली. प्रवाशी सावध झाले. मात्र, मुलासह उभ्या असलेल्या कावना दाम्पत्याने अचानक भरधाव वेगात येणार्‍या रेल्वे समोर उडी घेतली. रेल्वेच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.
या दुर्घटनेत सूनील कावना यांच्या डोक्याचा चोंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सौ.किर्ती आणि मुलगा यश रेल्वेच्या धडकने बाजूला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांची प्रकृतीचिंताजनक आहे. दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ 108 रूग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी मृत आणि जखमींना रूग्णवाहिकेत टाकले. जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कावना कुटूंबियांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची वार्ता सिंधी कॉलनीत समजताच माजी नगरसेवक अशोक मंधान यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. बेशुध्द असलेल्या जय ला ऍपेक्स् तर किर्ती कावना यांना गणपती रूग्णालयात दाखल करण्यात आले. ते बेशुध्दच होते.
10 मिनिटांच्या विलंबानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशी भयभित झाले असतांनाच फलाट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या नवदाम्पत्यात वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने विवाहितेने रेल्वेरूळावर उडी घेतली. प्रवाशांनी तात्काळ या महिलेला सुरक्षीत फलाटावर आणून तिच्या पतीला चोप दिला. नंतर हे दाम्पत्य तेथून निघून गेले. या दाम्पत्याची माहिती मात्र उपलब्ध होवू शकली नाही.

LEAVE A REPLY

*