Type to search

ब्लॉग

कुक्कुटपालनातही गैरव्यवहार

Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘कडकनाथ घोटाळ्या’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘महारयत ऍग्रो इंडिया या कंपनीने हा घोटाळा केल्याची चर्चा आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कडकनाथ जातीच्या कोंबड्यांमध्ये गुंतवणूक करायला लावून ङ्गसवणूक केल्याप्रकरणी कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष, संचालक, अकाऊंटंट आदींवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव या घोटाळ्याशी जोडले गेल्याने हा घोटाळा राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू लागला आहे. कडकनाथ घोटाळा केवळ सांगली आणि कोल्हापूर या शहरांपुरताच मर्यादित नसून त्याचे लोण राज्यभर पसरले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कोंबड्यांची कडकनाथ जात मांसाहारप्रेमींमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. या जातीची कोंबडी रंगाने काळी असते. लोेहाचे प्रमाण अधिक असल्याने तिचे रक्त आणि मांसही काळ्या रंगाचे असते. एवढेच नव्हे तर या कोंबडीची पिसे, चोच, जिभ, डोळे हेही काळेच असते. मध्य प्रदेशमधील धार आणि झाबुआ हे जिल्हे तसेच राजस्थान आणि गुजरातलगतचे काही जिल्हे या कोंबडीचे मूळ स्थान असल्याचे मानले जाते. या भागातले आदिवासी आणि गरीब नागरिक या कोंबड्या पाळतात. स्थानिक भाषेत तिला ‘कालामासी’ म्हटले जाते. कडकनाथचे मांस काळे आणि दिसायला चांगले नसले तरी चविष्ट आणि औषधी असल्याचे बोलले जाते. स्थानिक आदिवासी या कोंबडीचे रक्त अनेक जुनाट आजारांवर औषध म्हणून वापरतात. सामान्य कोंबडीच्या तुलनेत या कोंबडीच्या मांसामध्ये लोह आणि प्रथिने अधिक प्रमाणात असतात. त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यल्प असून प्रथिनांचे प्रमाण ९१.९४ टक्के असते. सामान्य कोंबड्यांच्या अंड्यांच्या तुलनेत कडकनाथची अंडीही अधिक पौष्टिक असतात. म्हणूनच या कोंबडीचे मांस आणि अंडी यांना चांगली किंमत मिळते. खुल्या बाजारात तिचे मांस १२०० रुपये किलो तर अंडी ५० रुपयांना एक या दराने विकली जातात.

याच कारणांमुळे अनेक शेतकर्‍यांनी कडकनाथ पालनाचा व्यवसाय सुरू केला असून अनेक महिला बचतगटही त्यात उतरले आहेत. राज्य शासनानेही कडकनाथ पालनासाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. या सगळ्याचा ङ्गायदा घेण्यासाठी ‘महारयत’ या कंपनीने कोल्हापूर आणि सांगलीमधल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. शेतकर्‍याने ७५ हजार रुपये गुंतवून कडकनाथ पक्षी घ्यायचे आणि कोंबड्या आणि अंडी पुन्हा रयतलाच विकायच्या अशी ती योजना होती. शेतकर्‍यांना पिल्ले घेताना ४० हजार रुपये भरावे लागत आणि उरलेले ३५ हजार रुपये तीन महिन्यांनी देण्याची सवलत होती. या पक्ष्यांसाठी लागणारे खाद्य, औषधे, लसी आणि भांडी पुरवली जात. तीन महिन्यांनंतर कंपनी १०० माद्या आणि २० नर ठेऊन ८० पक्षी घेऊन जात असे. चार ते पाच महिन्यांनंतर पक्ष्यांनी अंडी देण्यास सुरुवात केल्यानंतर कंपनी पहिली दोन हजार अंडी ५० रुपये प्रतिनग, त्यानंतरची दोन हजार अंडी ३० रुपये प्रतिनग आणि त्यानंतरची ३५०० अंडी २० रुपये प्रतिनग या दराने खरेदी करत असे. अंड्यांच्या विक्रीतून शेतकर्‍याला वर्षभरात २ लाख ३० हजार रुपये आणि कोंबड्यांच्या विक्रीतून आणखी ४५ हजार असे एकूण पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. केवळ ७५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर एवढा परतावा मिळणार असल्याने अनेक शेतकरी या योजनेला बळी पडले.

कंपनीने सुरुवातीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधल्या शेतकर्‍यांना योग्य परतावा देऊन विश्‍वास संपादन केला. यामुळे कंपनीकडे आणखी गुंतवणूकदार आकर्षित झाले. त्यातून कंपनीने सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, माढा, नाशिक, सोलापूर, अहमदनगर अशा अनेक ठिकाणी सुसज्ज कार्यालये थाटली. अंडी आणि पक्षी पंचतारांकित हॉटेल्समध्ये चढ्या दराने विकली जात असल्याची बतावणी करून हजारो गुंतवणूकदार जमवले. परंतु प्रत्यक्षात विक्री न करता तीच अंडी आणि तेच पक्षी नव्या गुंतवणूकदारांना देण्यात येत होते. नंतरच्या काळात मात्र विक्रीअभावी निधी कमी पडू लागला आणि गुंतवणूकदारांची देणी थकू लागली. परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी हेलपाटे मारायला सुरुवात केल्यावर संचालकांनी कार्यालयांना टाळे ठोकून पोबारा केला. आता या प्रकरणातले नेमके तथ्य कधी बाहेर येते ते पाहायला हवे. मात्र चारा घोटाळ्या-प्रमाणे हा कडकनाथ घोटाळाही राजकीय क्षेत्रातील वातावरण तापवत ठेवणार असे दिसते.

कक्कुटपालन, पशुपालन आदी जोडव्यवसाय शेती उद्योगासाठी महत्त्वाचा आधार ठरत आले आहेत. लाखोंचा नङ्गा मिळवून देणार्‍या कडकनाथ कोंबडीपालनाकडे ओढा वाढणे साहजिक आहे. मात्र या व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधींची ङ्गसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
अभय अरविंद

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!