कुकडी प्रश्‍नावरून एसपींची अचानक भेट

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – वारंवार कुकडी आवर्तनाचा प्रश्न निर्माण होऊन शेतकर्‍यांची आंदोलने होत असल्याच्या कारणातून तसेच श्रीगोंदा तालुकयातील विसापूर धरण कुकडी कालवा 110 किलोमीटर पासून नुकतेच आ. जगताप यांनी ज्या ठिकाणी कालव्यात बसून आंदोलन केले होते त्या ठिकणी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अचानक पाहणी करून विसापूर मधून सोडण्यात आलेल्या आवर्तनची माहिती घेतली यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भेट दिली.
कुकडी आवर्तनच्या पाणी मिळाले नसल्याने श्रीगोंदा तालुक्यात आंदोलने सुरु आहेत. 25 एप्रिल रोजी आवर्तन सुटले यावेळी आ. जगताप यांनी सुरु केलेलं आंदोलन 1 मे या महाराष्ट्र दिनापर्यंत सुरु होते. यानंतर पाणी खाली कर्जत ला गेले. तालुकयातील काही चार्‍याना पाणी सुटले मात्र अनेक ठिकाणी पाणी गेले नाही.
14 मे रोजी 132 चारी चे पाणी बंद झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. कुकडीचे पाणी मिळाले नसल्याने शेतकरी आक्रामक होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असतो. मागील अनेक वर्षापासून अशीच पारिस्थीती उन्हाळी आवर्तनात होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अचानक श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरणावर जाऊन पाहणी केली.
विसापूरमधून सोडण्यात आलेली पाण्याची माहिती घेतली. यानंतर 110 किलोमीटर पासून आ. जगताप ज्या ठिकाणी आंदोलनास बसले होते तेथ पासून पुढे 132 पर्यन्त कालव्याचे पाहणी केली.
यात वारंवार पाण्याचा साठी होत असलेल्या आंदोलन बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील तसेच शेतकर्‍यांचे पाणी प्रश्नाबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना केल्या आहेत.
विसापूर खाली शेतकर्‍यांना वेळेत पाणी मिळण्यासाठी अगोदर पाणी उपलब्ध करुन देता येईल का, शेतकर्‍यांचा पान्याबाबत आक्रोश कमी कसा करता येईल यावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्याशी चर्चा केली.

 

LEAVE A REPLY

*