किशोरवयीन मुलींनी आरोग्याची काळजी घ्यावी – बर्‍हाटे

0

यावल | प्रतिनिधी :  मुलींना वाचवणे आणि वाढवणे गरजेचे आहे. सर्व लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य केले तर गावाचे आरोग्य जपता येईल. शासनाच्या विविध आरोग्य सेवेचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी, हेमंत ब-हाटे यांनी आज चुंचाळे येथे केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचनालयाच्या वतीने आयोजित आरोग्य जनजागृती अभियानाच्या विशेष प्रचार कार्याक्रमाप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी, हेमंत ब-हाटे बोलत होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी, पराग मांदळे, वैद्यकीय अधिकारी, डॉ कुणाल मोरे, सामाजिक कार्यकर्ता, संदीप प्रभाकर सोनवने, माजी सरपंच व विविध कार्यकारी सोसायटीचे चेयरमन, सुनिल नेवे, सरपंच, ज्योती नेवे, श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, व्ही जि तेली, ग्रा प सदस्य अरमान तडवी, खान्देश युवा ङ्गाऊंडेशनचे अध्यक्ष, भरत चौधरी, एकात्मिक बालविकास प्रकल्पच्या मुख्य सेविका, अर्चना आठोडे, पोलिस पाटिल, गणेश साहेबराव पाटिल इत्यादी उपस्थित होते. डॉ. हेमंत ब-हाटे यांनी आरोग्य व आरोग्याच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तर अर्चना आठोडे यांनी कुपोषण व एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या योजनांविषयी अमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पराग मांदळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस बी गोसावी यांनी केले. या वेळी गरोदर माता व नवजात शिशुंसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आरोग्य विभागामार्ङ्गत करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी सकस आहार स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ६ वर्षा खालील मुला-मुलीं साठी सुदृद बालक स्पर्धा व किशोरवयीन विद्यार्थांचे आरोग्य मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्याना पारितोषिक देण्यात आले. तद्पुर्वी गावामध्ये आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थाची जनजागरण रैली काढण्यात आली. रैली मध्ये विद्यार्थांबरोबरच गावातील महिला व पुरुष, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा व आंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संखेने जनजागरण रैली सामील झाले. जादूगर राज अन्ड पार्टीने जादूच्या प्रयोगातून प्रबोधन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उल्हास कोल्हे, प्रदीप पवार, बापू पाटिल, विलास लांडगे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, ग्रामस्थ इत्यादीनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*