काव्य गझलांच्या धुंद आविष्काराने ‘इर्शाद’चे रसिकांवर गारूड… रसिक परिवाराचा उपक्रम

0

हसतो कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसतो म्हणजे… फक्त दाखविले फुले कागदी
आतुन आलो होतो बहरून ऐसे नाही…

अशा आणि इतर अनेक एकापेक्षा एक आशयपूर्ण कवितां व गझला सादर करीत माऊली सभागृहातील सायंकाळ अविस्मरणीय झाली. निमित्त होते रसिक ग्रुपच्या सांस्कृतिक परिवार आयोजित नामवंत कवी संदिप खरे व सिनेगीतकार वैभव जोशी यांच्या ‘इर्शाद’ या काव्य मैफलीचे..

स्वरचीत कवीतांचा स्वयंभू संवाद वेगळ्या पातळीवर नेणार्‍या अद्भूत आविष्काराने नगरकर रसिकांच्या मनावर गारुड करत विविध कविता व अनवट गझलांचे सादरीकरण त्याचबरोबर वैभव जोशी व संदिप खरे यांच्यातील मुक्त संवादातील जुगलबंदीने एक वेगळ्या उंचीचा अभिनव आविष्कार रसिकांनी अनुभवला.

यमक हरामम, पाऊसराव, हाय काय अन् नाय काय, कधीतरी वेड्यागत वागायला हवे स्पायडर मॅन अशा आशयपूर्ण कवितांना रसिकांनी वन्स मोअर व टाळ्यांनी दाद देत कार्यक्रमाला चार चाँद लावत रंगत आणली.

रसिक प्रेक्षकांची उर्त्स्फुत दात व कवींचा रसिकांशी मुक्त संवादाने कार्यक्रम बहरत गेला. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन स्वप्निल रास्ते यांनी केले.

बालपण, प्रेम, चंद्र, अलकोहोल अशा अनेक अर्थपूर्ण कविता व गझलांनी उपस्थितांना भारत-पाकिस्तान मॅचचाही विसर पडला.

पाहुण्यांचा सत्कार डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. राजीव सुर्यवंशी, सौ. चारुता शिवकुमार, सौ. वैशाली ससे, सौ. छाया रसाळ, सौ. संध्या कुलकर्णी यांनी केला. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी सांस्कृतिक परिवाराची नवीन सभासद नोंदणीसाठी रसिकांना आवाहन केले.

LEAVE A REPLY

*