काळजी घ्या : वाढत्या उन्हामुळे पुढील पाच दिवस धोक्याचे

0

नाशिक, दि.28, प्रतिनिधी

सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने या दिवसात तळपत्या उन्हात बाहेर पडू नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहचत आहे.

त्यामुळे या परिस्थितीत कुणीही दुपारच्या वेळी घराबाहेर पडल्यास उष्णता आणि उष्माघाताचा त्रास होण्याची वाढती शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

येत्या चार ते पाच दिवसात सूर्य डोक्यावर येणार आहे. याला शास्त्रीय भाषेत इक्विनॉक्स फिनॉमिना असे म्हटले जाते. त्यामुळे एकूणच भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान 40 अंश किंबहुना त्याहून जास्त वाढत आहे.

या कालावधीत कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

या दिवसात डोळे येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. ज्यांना हदयविकाराचा तसेच मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नियमित तपासणी करत रहावे, असेही सूचविण्यात आले आहे.

असे करावे उन्हापासून संरक्षण

आहारामध्ये रसदार फळांचा वापर करावा.

मांसाहार टाळावा. त्यामुळे शरीरप्रकृती बिघडण्याची शक्यता जास्त आहे.

फळांचा रस, थंड भाजी, फळभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.

ताक, दही याचाही समावेश आहारात असावा

लहान मुलांना बाहेर नेतांना त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

छत्री किंवा ओला रूमाल त्यांच्या डोक्यावर ठेवणे गरजेचे आहे.

डोळयांची काळजी घेण्यासाठी अतिनिल किरण रोखणारे विशेष बनावटीचे गॉगल्स परिधान करण्याची गरज आहे.

याशिवाय डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी वापरणे गरजेचे आहे.

कपडे परिधान करतानाही पांढरया रंगाला प्राधान्य द्यावे.

पांढरा रंग हा प्रकाश परावर्तित करीत असल्याने उन्हाच्या तडाख्यापासून आपला बचाव होवू शकतो.

पाण्याचे महत्वपूर्ण काम

उन्हाळयात शरीरातून कायम पाणी घामाच्या रूपाने बाहेर पडत असल्याने या कालावधीत मोठया प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसातून किमान चार ते पाच लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील कुलींग व्यवस्था सक्षम रहावी म्हणून दर अर्ध्या तासाला पाणी पित राहणे आवश्यक आहे. उन्हातून आल्यानंतर लगेचच थंड पाणी पिणे टाळावे. याशिवाय पाणी खुप झर झर न पिता हळू हळू शांतपणे पिणे आवश्यक आहे.

ऊन घातक कसे?

आपल्या शरिराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सीयस असते. या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर 37 अंश सेल्सियस तापमान कायम राखते. सतत घाम निघत असताना पाणी पित राहणे आवश्यक आहे.

जेव्हा बाहेरचे तापमान 45 अंश च्या पुढे जाते तेव्हा शरीरातील कुलींग व्यवस्था ठप्प होते. तेव्हा शरीराचे तापमान 37 अंशाच्या पुढे जाते. शरीराचे तामान जेव्हा 42 अंश सेल्सीयस पर्यंत पोहचते तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातील प्रोटीन अक्षरक्ष: शिजू लागतं. स्नायू कड होतात, श्वास घेण्यासाठी आवश्यक असणारे स्नायूही निकामी होतात. रक्तातील पाणी कमी झाल्याने रक्त घट्ट होते.

रक्तदाब कमी होतो व मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. माणुस कोमात जातो व त्याचे एक एक अवयव बंद पडून त्याचा मृत्यू होतो.

LEAVE A REPLY

*