कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करावे!

0
धुळे । शहराचा विकास आणि सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी धुळे महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा निर्धार करीत कार्यकर्त्यांनी संघटीतपणे काम करावे त्यासाठी शहरवासियांनी व पालिका हद्दीतील गावांनी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी केले.

धुळे महापालिका हद्दीत नवाने समाविष्ट झालेल्या बाळापूर येथे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याचे भूमीपुजन झाले. त्यावेळी आ. पाटील हे बोलत होते.

फागणे-वरखेडी-वणी-शिरडाणे-विश्वनाथ ते मोहाडी प्र.डा. हा एकूण 18 कि.मी. रस्त्याच्या कामास आ.पाटील यांच्या हस्ते भूमीपुजनाने शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी आ.पाटील यांच्या प्रयत्नाने 8 कोटी 97 लक्ष रुपयाची निधी मंजुर करण्यात आला आहे.

पुढे बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, विकासासाठी लढा दिला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांच्या संघटन शक्तीची गरज असते. धुळे तालुक्यात विकास कामे नियोजनबध्दरित्या केली जात आहे. विकास कामांबरोबरच सिंचनाच्या क्षेत्रात काम करुन तालुक्यातील शेतकर्‍यांना सुखी व समृध्द करण्याच्या ध्यास आमचा आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार फक्त घोषणा देत आहे. शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शहरातील जनता आणि शेतकरी बेजार झाली आहे. सरकारचा सर्वत्र सावळा गोंधळ सुरु असून हे बदलविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीमागे जनतेने खंबीरपणे उभे रहावे.

धुळे शहरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे, मागील निवडणूकीत लढा देवून धुळे महापालिकेत काँगे्रसच्या मतांची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे या निवडणूकीत काँग्रेसच महापालिकेत सत्ता स्थापन करेल त्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. शहरातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते त्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज आहे.ते नेतृत्व आता आपण देवू शकतो. त्यामुळे धुळे महापालिकेत जोडली गेलेली धुळे ग्रामीण मतदारसंघातील गावे आणि धुळे शहराचा विकास साधायचा असेल तर कार्यर्त्यांनी संघटीतपणे एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि त्यांना महापालिका क्षेत्रातील मतदारांनी काँग्रेसच्या पाठीमागे उभे रहावे असेही आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केले.

जि.प.सभापती मधुकर गर्दे म्हणाले की, भाजपा सरकारने सर्वत्र सावळा गोंधळ सुरु केला आहे. शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही शेतकरी संकटात असून सरकाने त्यांना वार्‍यावर सोडले आहे.यावेळी पं.स. ज्ञानेश्वर मराठे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष युवराज करनकाळ, माजी सभापती शांताराम राजपुत, जि.प.सदस्य किरण अहिरराव, नगरसेवक सदाशिव पवार, जि.प.सदस्य राजू मालचे, पं.सदस्य जी.डी.पाटील, ज्ञानेश्वर मराठे, भोलनाथ पाटील, खेमराज पाटील, माजी सरपंच शिवाजी अहिरे, सुतगिरणी संचालक बापू नेरकर, माजी सरपंच प्रकाश मराठे,शहर युवक काँग्रेस प्रीतम करनकाळ,कृऊबा उपसभापती रितेश पाटील,मधुकर पाटील, विनायक मराठे, दिलीप पाटील, फागणे सरपंच कैलास पाटील,अभिमन पवार, जितेंद्र पवार, विजय वाघ, यांच्यासह बाळापूर,फागणे, तसेच धुळे शहरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*