कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपर्क कार्यालय

0

काळेः राहाता राष्ट्रवादीचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन

 

राहाता (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव विधान सभा मतदार संघामध्ये राहाता तालुक्यातील 11 गावातील जनतेने माजी आमदार अशोकराव काळे यांना भरघोस मतांनी निवडून दिले. या ऋणातून उतराई होण्यासाठी आमदार अशोकराव काळे यांनी या 11 गावांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकास कामे केली.

 

 

नागरिकांचे ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपर्क कार्यालय स्थापन केले असल्याचे युवा नेते आशुतोष काळे यांनी राहाता संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 

 

शिर्डी, राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी राहाता येथे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले असून या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले.

 

 

यावेळी दिलीपराव चौधरी किसान सेल अध्यक्ष, अण्णासाहेब कोते वक्ता प्रशिक्षण सेल अध्यक्ष, विजयराव गडाख सोशल मेडिया अध्यक्ष, दीपक वाघ सहकार सेल अध्यक्ष, मुरलीधर शेळके जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष, सुनील थोरात ओबीसी सेल अध्यक्ष, विनायक देठे विद्यार्थी सेल अध्यक्ष, तसेच राहाता तालुका युवक सेल अध्यक्षपदी आनंद शहा व शायद सय्यद यांची अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

 

यावेळी राहाता तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, संचालक आनंदराव चव्हाण, बाळसाहेब बारहाते, जी.प. सदस्य सुधाकर दंडवते, सुधाकर रोहोम, विठ्ठलराव आसने, अशोक काळे, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, राजेंद्र पोतदार युवक जिल्हा उपाध्यक्ष, रमेश गोंदकर, अमित शेळके, सर्जेराव जाधव, मुरलीधर थोरात, तुकाराम वहाडणे, डॉ. गुंजाळ, मुरलीधर शेळके, माऊली काळे, अनिल कोते, सुनील थोरात, सोपानराव गिधाड, सुनील आरणे, बाळासाहेब वर्पे, सुनील थोरात, सौ. मंदा थोरात, सौ. अलका थोरात आदी मान्यवरांसह राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

सूत्रसंचालन राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शशिकांत लोळगे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

*