Type to search

धुळे

कार्तिक स्वामींचे मंदिर आज दर्शनासाठी खुले होणार

Share

धुळे । शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील श्री कार्तिक स्वामींच्या मंदिरात उद्या दि.12 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौणिमेनिमित्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्तिक स्वामींच्या मंदिर व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळला आहे. अशी माहिती भरत विष्णूप्रसाद अग्रवाल यांनी दिली आहे.

शहरातील    चाळीसगाव रोडलगत गीता जिनींग व प्रेसिंग कारखाना आहे. पूर्वीच्या बिजेराम डेडराज ऑईल मिल आवारात शेठ पन्नालाल जीवनराम अग्रवाल यांनी संवत 1982 श्रावण शुध्द अष्टमीच्या दिवशी श्री महादेव मंदिराची स्थापना केली. याचवेळी या जुन्या पध्दतीच्या घुमट आकाराच्या मंदिरात गणपती, शिवशंकर, पार्वती माता व हुनमान यांच्या आकर्षक अशा संगमरवरी मूर्तींसह श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या ठिकाणी येणार्‍या भाविकांची नंतरच्या काळात श्रध्दा दृढ होत गेली. हे मंदिर जागृत असल्याची भावना निर्माण झाल्याने दरवर्षी या मंदिरात सतत महिला व पुरुषांची गर्दी वाढतच राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर मंदिराचे प्रमुख भरत अग्रवाल यांनी यंदाही भाविकांच्या सुविधांसाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न केले आहेत. मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यांवर प्रखर झोत फेकणारे दिवे, रस्त्यांची डागडूजी व स्वच्छ करणे, मंदिराला विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता इ. कामांवर भर देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात श्री कार्तिक स्वामींची मंदिरे अपवादात्मक ठिकाणीच आहेत. कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची या ठिकाणी गर्दी वाढणार आहे. त्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. भाविकांनी दर्शनाला येतांना गीता जिनींगच्या आवारात बाहेरील मोकळ्या जागेत दोन, तीन किंवा चारचाकी वाहने उभी करावीत, वाहने उभी करतांना पादचारी तसेच भाविकांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.  मंदिरात ध्वनीक्षेपण यंत्रणेद्वारे मंत्रोपचार, पूजाअर्चा आदी कार्यक्रम होणार असल्याने रांगेतून दर्शन घ्यावे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त यंदाही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!