कारागृह अधिक्षक डाबेराव यांच्या अकोल्यातील फ्लॅटची झाडाझडती

0

 

जळगाव / जळगाव उपकारागृहाचे कारागृह अधिक्षक दिलीपसिंग डाबेराव यांना तक्रारदारांकडून 2 हजार रुपयांची लाच स्विकारतांना अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

कारगृह अधिक्षक डाबेराव यांचा अकोला येथे फ्लॅट असल्याने अकोला अ‍ॅन्टी करप्शनच्या विभागाने त्यांच्या फ्लॅटचीही झाडाझडती घेण्यात आली आहे.

कारागृह अधिक्षक डाबेराव यांच्यासह कारागृह शिपाई बापू आमले यांना लाच स्विकारतांना कारागृह अधिक्षक डाबेराव यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली.

त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या विभागाला डाबेराव यांचा अकोला येथे फ्लॉट असल्याचे कळले असता पोलिस उपअधिक्षक पराग सोनवणे यांनी अकोला अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या संपर्क साधून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली.

परंतु त्यांच्या घरात कुठलीही मालमत्ता मिळुन आलेली नसल्याचे समजते.

शासकीय निवासस्थानाची देखील तपासणी
कारागृह अधिक्षक दिलीपसिंग डाबेराव यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सकाळी 11.15 वाजता लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्या शासकीय निवासस्थानाची जवळपास अर्धातास तपासणी केली.

या ठिकाणी किरकोळ स्वरुपात काही रोकड सापडली असून दोन बँकांचे पासबुक देखील मिळून आले आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास कारागृह शिपाई बापु आमले यांच्या देखील घराची तपासणी करण्यात आली.

दोघांना आज न्यायालयात हजर करणार
कारागृह अधिक्षक डाबेराव यांच्यासह कारागृह शिपाई बापु आमले यांना लाच स्विकारतांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दोघांची चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आले. तसेच कायदेशीर पुर्तता करून सायंकाळी दोघांना अटक दाखविण्यात आल्याने उद्या दि.6 रोजी दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*