काय आहेत नाशिक पोलिस भरतीबद्दलच्या सहा शंका?

0

नाशिक, ता. २४ : शहरात पोलिस भरती सुरू असून ही प्रक्रिया पारदर्शक आणि अधिक सोईस्कर कशी करता येईल याकडे नाशिक पोलिसांचा कल आहे.

त्यांच्यासाठी बाथरूम, पिण्याचे पाणी, खाण्याचे स्टॉल्स या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच धावण्याची चाचणी दुपारच्या उन्हात न घेता सायंकाळी घेतली जात आहे.

यासंदर्भात सर्वसामान्य उमेदवारांना पडणाऱ्या सहा प्रश्नांचा उहापोह एका ऑडिओ क्लिपद्वारे नाशिक पोलिस उपायुक्त श्रीकांत धीवरे यांनी केला आहे.

ते प्रश्न आणि उत्तरे वाचकांच्या माहितीस्तव

WhatsApp Image 2017-03-23 at 13.47.57प्रश्न १ : भरतीप्रक्रियेसाठी मी कोणत्याही दिवशी येऊ शकतो का?

उत्तर : नाही. मा. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून भरतीप्रक्रियेसाठी ज्या तारखेची पत्र उमेदवारांना मिळाली आहेत, त्याच दिवशी त्यांनी यायचे आहे.

प्रश्न २ : भरती प्रक्रियेत पोलिसांच्या मुलांना वशिला चालतो का?

उत्तर :  नाही. ही प्रक्रिया पारदर्शक आहे. यासंदर्भातील कोणतीही माहिती शंका घेणाऱ्यांना पडताळता येईल. तसेच या प्रक्रियेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही लक्ष ठेवण्यासाठी पाचारण केले आहे. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तसे लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. केवळ स्पर्धात्मक आणि गुणात्मक निकषांवरच उमेदवारांची निवड होणार आहे.

प्रश्न ३ : शारीरिक क्षमता चाचणीच्या गुणांबद्दल शंका किंवा आक्षेप असल्यास काय करावे?

उत्तर : या चाचणीत उंची, छाती यांचे आकारमान, उंच उडी, पूलअप्स, गोळाफेक, धावणे (१६०० मीटर व १०० मीटर) अशी चाचणी घेण्यात येत आहे. या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. आपल्याला ते तपासता येईल. प्रत्येक उमेदवारांची त्यांच्या मार्कांसमोर सही घेतली जात आहे व त्यांना संबंधित स्टॉपवॉच देखील दाखविण्यात येत आहे. तरीही शंका असल्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक उपायुक्त, उपायुक्त व पोलिस उपायुक्तांकडे अपिल करता येणार आहे.

WhatsApp Image 2017-03-23 at 13.48.44प्रश्न ४ :  लेखी परीक्षेचा दिनांक, वेळ व स्वरूप काय असेल?

उत्तर : लेखी परिक्षेची तारीख व वेळ सर्व शारीरिक क्षमता चाचण्या झाल्यानंतर कळविण्यात येणार आहे. लेखी परीक्षा मराठीत असणार आहे. १०० मार्कांची, ऑब्जेक्टिव्ह असे तिचे स्वरूप असेल. प्रश्नपत्रिकासुद्‌धा उमेदवारांसमोर काढली जाणार आहे. त्याआधी कुठल्याही स्थितीत काढली जाणार नाही.

प्रश्न ५ : लेखी परिक्षेसाठी किती उमेदवार पात्र ठरतील?

उत्तर :  ज्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५० पेक्षा जास्त मार्क पडतील अशा उमेदवारांचा लेखी परीक्षेसाठी विचार होणार आहे. नाशिकसाठी ९७ जागा असून त्यांच्या १५ पट उमेदवारांना म्हणजेच १४५५ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल.

परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी उमेदवारांना देण्यात येईल. तसेच त्यानंतर तीन तासाच्या आत प्रश्नांची उत्तरे असलेली उत्तर पत्रिका फलकावर लावण्यात येईल. त्यातून उमेदवार आपल्या प्रश्नांची उत्तरे पडताळून पाहू शकतात.

प्रश्न ६ : भरती प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे आणावयाची आहेत?

उत्तर : भरती प्रक्रियेच्यावेळी कोणतेही कागदपत्र आवश्यक नाही. ही सर्व कागदपत्र निवडीच्या वेळेस जमा करावयाची आहेत. भरती प्रक्रियेच्या वेळेस केवळ तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आणि पोलिस महासंचालकांकडून मिळालेले पत्र आणावयाचे आहे.

विशेष सूचना : उमेद्वारांनी भरतीसाठी येताना पिण्याचे पाणी आणि खाण्याचे पदार्थ सोबत आणावयाचे आहेत. तसेच बाहेरगावाहून भरतीसाठी येणाऱ्या व मुक्कामी थांबणाऱ्या गरीब उमेदवारांसाठी पूर्व विनंतीनुसार पोलिस बराकी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

WhatsApp Image 2017-03-23 at 13.49.54

 

LEAVE A REPLY

*