कापड बाजारातील जैन मंदिरात उद्यापासून पर्युषण पर्व

0

दि.21 कल्पसूत्र वाचन 22 ला महावीर स्वामी पाळणा ; 25 ऑगस्टला संवत्सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कापड बाजार जैन मंदिरातील यंदाचा पर्युषण पर्व अभुतपर्व वेगळा असेल, पुज्य साध्वीजी श्री संवेगनिधीश्रीजीच्या प्रेरणेतून आणि पुज्य साध्वीजी देशणानिधीजी यांच्या संकल्पनेतून पर्युषणमध्ये विविध नाविण्यपूर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर (प्रतिनिधी) – कापड बाजार जैन मंदिरातील यंदाचा पर्युषण पर्व अभुतपर्व वेगळा असेल, पुज्य साध्वीजी श्री संवेगनिधीश्रीजीच्या प्रेरणेतून आणि पुज्य साध्वीजी देशणानिधीजी यांच्या संकल्पनेतून पर्युषणमध्ये विविध नाविण्यपूर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्मियांचा सर्वोच्च महत्वाचा पर्युषण पर्व 18 ऑगस्टपासून सुरु होत असून, नेहमीच्या धार्मिक आराधनांबरोबरच प्रथमच सेवन वंडर्स ऑफ पर्युषण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध प्रदर्शने, वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी, दोन्ही मंदिरात रोज सजावट, अंगरचना, भक्तीसंध्या आणि सर्वात महत्वाचे ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. रांगोळी दर्शन – 18 ऑगस्ट रोजी त्रिशला मातांना भगवान महावीर जन्माआधी पडलेल्या 14 स्वप्नांचे दर्शन आणि फलप्राप्ती असे सादरीकरण आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून होणार आहे. तीर्थ दर्शन – शनिवार दि. 19 रोजी भारतातील प्रख्यात जैन तीर्थक्षेत्रांचे दर्शन स्लाईड शो आणि चित्रफितीच्या माध्यमातून होईल. आगम दर्शन – रविवार दि. 20 रोजी 45 आगम महत्व आणि दर्शन. विश्‍व दर्शन – सोमवार 21 रोजी भगवान महावीरांनी सांगितलेली विश्‍वव्यवस्था उडी मॉडेलसद्वारा दाखवण्यात येईल. कल्याणक दर्शन – मंगळवार दि. 22 रोजी तीर्थंकारांचे पाच कल्याणकांचा भव्य देखावा सादर करण्यात येईल. व्रत दर्शन – बुधवार 23 ऑगस्ट रोजी जैन श्रावकांसाठीच्या बारा व्रतांसंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण. सिद्धांत दर्शन – गुरुवार दि. 24 रोजी अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह या जैन धर्माच्या तीन सिद्धांतावर आधारित सादरीकरण व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. पुज्य साध्वीजी श्री.संवेगनिधीश्रींच्या प्रेरणेने 18 ऑगस्टपासून रोज पहाटे 5.30 वाजता प्रतिक्रमण, 9 वा. पुज्य साध्वीजींचे हिंदीतून प्रवचन, सायं. प्रतिक्रमन या बरोबरच रोज विविध नाविण्यपूर्ण कार्यक्रम प्रथमच होत असल्याचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सांगितले. पर्युषणच्या चौथ्या दिवशी सोमवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. जैन धर्मग्रंथ कल्पसूत्र पुजन आणि वाचन, तर पर्युषणचा पाचवा दिवस 22 ऑगस्ट रोजी भगवान महावीर जन्मोत्सव, 14 स्वप्ने आणि भगवान महावीरांचा पाळणा घरी होऊन जाण्याचा चढावा तर पर्युषणचा आठवा दिवस शुक्रवार 25 रोजी सकाळी 12 महिन्यांचे चढावे तर दुपारी 2.30 वाजता संवत्सरी प्रतिक्रमण होईल. शनिवार दि. 26 ऑगस्ट रोजी भव्य वरघोडा मिरवणुक दुपारी 2.30 वाजता होईल. शनिवार दि.26 ऑगस्टच्या पहाटे 5.30 वा. जैन मंदिर द्वार उद्घाटन, कापड बाजार आणि गुजरगल्ली दोन्ही जैन मंदिरात रोज भव्य सजावट आणि प्रभुमुर्तीला आकर्षक अंगरचना, दररोेज कल्पसूत्र, बारसासुत्र वाचन, रात्री दोन्ही मंदिरात भक्ती सध्या  होईल, असे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*