कापडण्यात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

0
कापडणे । गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आयुष्य वेचणार्‍या येथील विविध क्षेत्रातील गुरुजनांचा येथे सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत 15 शिक्षकांच्या घरी जावून त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

येथील भारतीय जनता पार्टीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपले उभे आयुष्य शैक्षणिक क्षेत्रास अर्पण करत येथील अनेक शिक्षकांनी येथील व परिसरातील विद्यार्थी घडविले. या शिक्षकांच्या शैक्षणिक कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुरुवर्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक दंगल दोधू पाटील, रावण महारु पाटील, रोहिदास सखाराम पाटील, रामदास विठ्ठल वाघ, सुरेश खंडेराव पाटील, दिगंबर धनगर पाटील, मधुकर बुधा बोरसे, रामभाऊ गरबड पाटील, सुखदेव नारायण पाटील, प्रा.अशोक शिवराम पाटील, रामचंद्र लहू पाटील, विश्वासराव देसले,

चिंधू लोहार, सजन भामरे, जगन्नाथ पाटील यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन भाजपातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पाटील, ग्रा.पं.सदस्य भटु पाटील, अमोल पाटील, पितांबर पाटील, भाजपाचे बन्सीलाल वंजी पाटील, ललित बोरसे, योगेश बाबुराव पाटील, संतोष पाटील, दिलीप पाटील, सागर खलाणे, भटु वाणी, जगदीश पाटील, प्रकाश माळी, गणेश माळी, आकाश कुंभार, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*