Type to search

maharashtra धुळे

कापडण्यात इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेचा शुभारंभ

Share

कापडणेे । येथे पोस्ट विभागातर्फे इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बॅकेचा शुभारंभ नुकताच धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कुणाल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील, धुळे जि. प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती नुतन पाटील, जेष्ठ साहित्यीक रामदास वाघ, सरपंच भटू पाटील, उपसरपंच कविता पाटील, मनोज पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल पाटील, दीपक पाटील, धुळेचे एरीया सेल्स मॅनेजर समिर कोर्डे, शिरपूर डाक निरीक्षक डिगंबर चौधरी,

कापडणे बॅक शाखाप्रमुख मनिषा कुलकर्णी, मधुकर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कापडणे उपडाकघर अंतर्गत देवभाणे, बोरीस, लामकानी येथील डाक घर शाखेतही इंडिया पोस्ट पेमेन्टस बँकेचे उद्घाटन करण्यात आले. या बोलतांना आ. कुणाल पाटील हे म्हणाले की, पतपेढयांवर ग्राहकांचा सध्या पाहिजे तेवढा भरवसा राहिलेला नाही, बर्‍याच वेळेस ठेवलेले पैसेही बुडतात. म्हणुन याला उत्तम पर्याय आता इंडिया पोस्ट पेमेंटस बँक हाच आहे. हा भरोसाचा मुख्य पर्याय असल्याने या बँकेत प्रत्येकाने खाते उघडून स्वतःला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करुन घेणे जास्त उचित ठरणार आहे असे त्यांनी सांगितले. रामदास वाघ यावेळी म्हणाले की,

भारतीय डाक विभागाने चांगली व फायदेशिर योजना प्रत्येक भारतीयांसाठी आणली आहे. पुर्वी पोस्टमन आपल्या घरी पत्र घेवुन घरी यायचा आता मात्र प्रत्येकाच्या दारी पोस्टमन पेमेन्टे बॅकेलाच घेवुन येणार आहे. यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतल्यास बॅक ग्राहकांचाच फायदा मोठा होणार आहे. प्रास्तविक डिगंबर चौधरी तर सुत्रसंचालन भुषण ब्राम्हणे यांनी केले. आभार मनिषा कुलकर्णी यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!