Type to search

धुळे

कापडण्यात आज पालखी सोहळा

Share

कापडणे । येथील श्री.विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे आज(दि.12) आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री.विठ्ठल रुखमाई मंदिर व श्री.गुरुदत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन भाविक दिवसभर मनोभावे दर्शन घेतील. श्री.विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने देवशयनी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी टाळ सप्ताहाचा समारोपही करण्यात येतो. दि.13 रोजी श्री.विठ्ठल मंदिरात दहीहंडी, गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन उपस्थितीचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

देवशयनी आषाढी एकादशीच्या पाश्वभूमीवर श्री. विठ्ठल रुखमाई मंदीरात व श्री.दत्त मंदिरात टाळ सप्ताहाचे आयोजन केले गेले. आषाढी शुध्द पंचमीपासुन सुरु झालेल्या या अखंड टाळ सप्ताहात असंख्य भाविक सहभागी झाले. येथे श्री.विठ्ठल रुखमाईंचे भव्य दुमजली मंदीर असुन एकादशीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. एकादशीनिमित्त सकाळी महापूजा, महाआरती, काकड आरती आदींचे आयोजन करण्यात आले आहे, यानंतर श्री.विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने टाळ-मृदंगाच्या गजरात निघणार्या पालखी सोहळ्यात विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत. श्रींची पालखी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान गावातुन फिरविण्यात येईल.

या पालखी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल भजनी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर काशिराम पाटील, उपाध्यक्ष शांताराम देवराम माळी, सचिव बाबुलाल हिलाल पाटील, पुजारी कालिदास पुरुषोत्तम जोशी, भजनी अध्यक्ष अरविंद मुरलीधर शिंपी, कार्यकारिणी सदस्य मुरलीधर शिंपी, बाबुराव पाटील, दिनकर पाटील, रामचंद्र जोशी, नवल पाटील, रावण माळी, सुनिल माळी, जिजाबराव पाटील, सुरेश माळी, किशोर पाटील, प्रमोद माळी, चुडामण पाटील, हेमंत पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रामकृष्ण पाटील, महादू धोबी, जगन्नाथ माळी, ज्ञानेश्वर माळी, कमलबाई माळी, रंगराव पाटील, भानुदास पाटील, प्रमिला शिंपी, नवल चौधरी आदी प्रयत्नशिल आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!