Type to search

नंदुरबार

काथर्दे-दिगर येथे माता सभा व प्रशिक्षण

Share

नंदुरबार | तालुक्यातील काथर्दे-दिगर येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे माता सभा व प्रशिक्षण घेण्यात आले. सभेस डीआरएल विकास निकुंभे व जेष्ठ महिला उपस्थित होते. सचिन कोळी यांनी सर्वप्रथम फाउंडेशनविषयी मातांना माहिती दिली. तसेच फाउंडेशनअंतर्गत चालू असलेल्या विविध प्रोग्रामबद्दल माहिती देण्यात आली. रीड इंडिया ऍडव्हान्स/बेसिक, लायब्ररी इंटरवेन्शन, ग्राम शिक्षा केंद्र व समर कॅम्प याबद्दल माहिती देण्यात आली. उपस्थित मातांना एक-एक साहित्य वाटप करून त्याबद्दल माहिती देण्यात आली. त्या साहित्याचा वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

सभेला काही शिक्षित व काही अशिक्षित माता उपस्थित होत्या. मातांना त्यांचा मुलांच्या जडण-घडणीत कसा सहभाग असतो, याबद्दल त्यांचे प्रबोधन करण्यात आले. प्रशिक्षणात मातांना चित्र कॅलेंडर, गोष्ट कार्ड, संख्या चार्ट व स्वाध्याय पुस्तिका यांचा वापर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे, त्यांना गोष्ट तयार करण्यास सांगणे, संख्या चार्टच्या साह्याने बेरीज-वजाबाकी करणे, चित्र कॅलेंडरच्या साह्याने चित्रात काय दिसते हे विद्यार्थ्यांकडून काढून घेणे आदी साहित्याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली. तसेच त्याचा वापर कसा करावा? याबाबत त्यांचे प्रबोधन केले व मुलांचा संगोपनात मातेचा सहवास किती महत्वाचा आहे? याबद्दल त्यांना माहिती दिली. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन सचिन कोळी यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!