कांद्याचे शंभर रुपये प्रतिक्विंटल अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न

आमदार जयवंत जाधव यांच्या प्रश्नावर पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे उत्तर

0

नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळणाऱ्या प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल अशी ग्वाही पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत  दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव यांनी याबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित करत कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी उपेक्षित राहिल्याबाबाबत चिंता व्यक्त केली. या चर्चेला देशमुख उत्तर देत होते. कांद्याच्या निर्यातीला मुदतवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात “कांदा हब” बनवणार असून यासाठी शंभर टक्के पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातील, असं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं.

कांदा उत्पादक शेतकर्यांचं  43 कोटी रुपयांचं अनुदान लवकरच देणार असल्याचं ते म्हणाले.सरकारने गेल्या एक वर्षात सात लाख 69 हजार मेट्रिक टन साठवणुकीची क्षमता असलेल्या कांदा चाळी उभारल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शेतमाल प्रक्रिया धोरण निश्चीत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून कांदा उत्पादक शेतकर्याला कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले.

कांदा आणि अन्य शेती उत्पादन अन्य राज्यात पाठवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय किसान बाजार या नावाने प्रवासी रेल्वेला एक डबा जोडण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे तसंच आसाममधे पणन खात्याचं कार्यालय सुरु करणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

*