काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी धरल्या एकमेकींच्या झिंज्या

0

पक्षाचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात, तिघींवर अदाखलपात्र गुन्हे दाखल

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – एकमेकींच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावण्याच्या नादात विकोपाला गेलेल्या वादात नगर शहरातील काँग्रेसच्या दोन महिला पदाधिकार्‍यांनी भर रस्त्यावर एकमेकींच्या झिंज्या धरल्या. हा वाद महिला काँग्रेसमधील असला तरी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी व पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करीत एकमेकींना उद्ध्वस्त करण्याच्या व ठार मारण्याच्या धमक्याही यावेळी परस्पर देण्यात आल्या. या प्रकारामुळे शहर महिला कँग्रेसमधील गट-तट आणि वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहेत.

 

 

काँग्रेसकडून प्रदेश पातळीवरून हस्तक्षेप होऊनही हे प्रकरण न शमल्याने गुरुवारी दुपारी उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तीन महिलांवर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत.

 

 

गुरुवारी (दि.27) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शिलाविहार परिसरात राहणारी काँग्रेेसची एक पदाधिकारी महिला तिच्या रेल्वेस्थानक रोडवरील आगरकरमळा येथील मैत्रीणीकडे गेली होती. यावेळी तेथे राहणार्‍या काँग्रेसच्या दुसर्‍या पदाधिकारी महिलेने तिला पाहिले. तुम्ही दोघी मिळून मला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहात. त्यामुळे तुमच्या दोघींचा बेत बघते. तुम्ही दोघींचे राजकारण संपविते असे म्हणून वादाला सरुवात केली. पक्षश्रेष्ठींना सांगून तुझे पद घालवते अशी धमकी दिली. तसेच दुसर्‍या मैत्रीणीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करते. एका पालकमंत्र्याचे व माझे चांगले संबंध असून त्यांना सांगून दोघींना उद्ध्वस्त करते असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली असे एका फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी काँग्रेसच्या अन्य महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

 

 

 

तर दुसर्‍या फिर्यादीत म्हटले आहे की; काँग्रेसच्या पदाधिकारी महिला आगरकर मळ्यात आल्या होत्या. त्यांनी फिर्यादी महिलेस घराबाहेर बोलाविले. तू आमची बदनामी करतेस, असे म्हणून दोघींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेने दोघींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता दोघींना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. महिलांचा हा सिनेस्टाईलने सुरू असणारा मारहाणीचा गोंधळ पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पक्षाची आब्रू वाचविण्यासाठी उपस्थित महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने ही माहिती प्रदेशच्या महिला पदाधिकार्‍यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने दोन्ही गटांना वादावर पदडा टाकण्याचे आदेश दिले.

 

 

शहर काँग्रेसमधील एक पुरुष पदाधिकारी घटना स्थळी दाखल झाला. त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही प्रकरणात गोवण्याची धमकी देण्यात आली. अखेर त्यानेही त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
मात्र दोन्ही गटांचे वाद कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन धडकले. या दोन्ही घटनांप्रकरणी तक्रारीनुसार परस्परविरोधी अदखलपात्रगुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

साधारण आठ ते दहा महिन्यांपासून शहर महिला काँग्रेसमधील वाद विकोपला गेलेला आहे. पक्षाच्या महिला संघटनेत दोन गट पडले असून त्यांच्या वादाला अनेक कंगोरे आहेत. साधारण पाच महिन्यांपूर्वी शहरातील एका बड्या पदाधिकार्‍यांनी नगरमध्ये एका पुणे रस्त्यावरील हॉटेलात बैठकीत महिला पदाधिकार्‍यांमध्ये सर्वांसमक्ष झोंबाझोंबी झाली होती. त्यानंतर काही महिला पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर शहरात हे पदाधिकारी एकमेकांना डावलून पक्षाचे कार्यक्रम घेतल्याची चर्चा पक्षातून कानावर आली.

 

 

शनिवारी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहावर प्रदेशपातळीवरून महिला काँग्रेसेच निरिक्षक येणार आहेत. यावेळी शहरातील काँग्रेसमधील वादावर सविस्तर चर्चा होणार असून त्यानंतर प्रदेश पातळीवर याबाबत अहवाल देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*