काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांची घरवापसी

0

बेंगळुरूमध्ये ‘बंदिस्त’ करून ठेवलेले गुजरातमधील काँग्रेसचे ४४ आमदार अखेर अहमदाबादमध्ये घरवापसी झाली आहे.

आणंदमधील निरजानंद रिसोर्टमध्ये या आमदारांना हलवण्यात आले असून रिसोर्टबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

गुजरातमधील काँग्रेसच्या ५७ पैकी सहा आमदारांनी पक्षाला रामराम केल्यानंतर काँग्रेसने धसका घेतला आणि उर्वरित ५१ पैकी ४४ आमदारांना काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये हलवले. आठवडाभर हे आमदार बंगळुरुजवळील ‘इगलटन गोल्फ रिसोर्ट’मध्ये बंदिस्त होते. मंगळवारी गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटे काँग्रेसचे ४४ आमदार अहमदाबादमध्ये परतले.

LEAVE A REPLY

*