काँग्रेसचे नेतृत्व मुके अन् बहिरे

0

कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, न्याय मिळेल : दानवे

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेली 20 वर्षे लोकसभेत खासदार म्हणून काम करत आहे. काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांना तेव्हापासून पाहत आहे. गांधी यांना कधीही पक्षाच्या खासदारांच्या हातात हात देऊन बोलतांना किंवा कोणत्या खासदाराला अभिवादन करतांना पाहिलेले नाही. यावरून काँग्रेसचे नेतृत्व मुके आणि बहिरे असल्याचे दिसते अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये केली.

 
पंडित दिनदयाळ उपाध्यायाय जन्म शब्तादीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवारी प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, जिल्ह्याचे प्रभारी आ. भिमराव धोंडे, खा. दिलीप गांधी, बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सुनील रामदासी, सुरेखा विद्ये, गौतम दीक्षित, राजश्री मोरे, भैय्या गंधे, नितीन शेलार, डॉ. अजित ङ्गुंदे, गितांजली काळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
दानवे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात राज्यात तीन वेळा दौरे केला. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. दुसर्‍या पक्षात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्याला अगोदरच्या रात्री झोप येत नाही. मात्र, भाजपात प्रवेश करणार्‍यांनी संयम बाळगावा. भाजपा हा महासमुद्र आहे. या महासमुद्रात चोहो बाजूने पाणी जमा झालेले आहे. जे जे भाजपात आले त्यांना सन्मान मिळालेला आहे. उदाहरण द्याचे झाले तर कोपरगावमध्ये स्नेहलता कोल्हे, पाथर्डीत मोनिका राजळे, श्रीगोंद्यात पाचपुते यांना आमदारकीचे तिकीट मिळाले असल्याचे स्पष्ट केले.

 
दानवे पुढे म्हणाले की ते स्वत: 37 वर्षापासून पक्षात काम करत आहेत. प्रदेशाध्यक्ष होण्यास 37 वर्षे लागले. यामुळे कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, त्यांना न्याय जरूर मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. देशाच्या ग्रामीण भागासह जगात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या ताब्यात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आल्यापासून काँग्रेस सलग 23 निवडणुका हरल्या आहे. भाजपाची घोडदौड पाहून ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ता अस्वस्थ झाला असून काँग्रेस पक्ष पराभवातून बाहेर पडला नसल्याने दिशा हीन झाला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

 
राष्ट्रीय उपाध्यक्ष जाजू यांनी भाजपने मुस्लीम आणि खिश्‍चन बहुभाषी प्रदेशात यश मिळवलेले आहे. जनता जात-पात पाहत नाही, जनेला विकास हवा आहे. भाजपाने विचार प्रत्यक्षात व्यवहारात आणला आहे. यामुळे देशातील जनता भाजपाच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. प्रास्ताविक खा. दिलीप गांधी यांनी केले. आ. धोंेडे यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले.

 
यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, नंदा कुलकर्णी, संतोष हजारे, अनिल परवडकर, संदीप पवार, ज्ञानदेव रास्कर यांच्यासह असंख्या नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी दिल्लीगेट येथून दानवे यांचे स्वागत करण्यात येऊन मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

*