काँगेस नगरसेवकांनी थाटले पालिकेच्या दारातच दालन

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना स्वतंत्र दालन मिळण्यासाठी मुख्याधिकारी श्री. मोरे यांच्याकडे वेळोवेळी लेखी स्वरूपात मागणी केली होती. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी बांधकाम समितीचे सभापतींचे दालन उपनगराध्यक्ष दालन म्हणून वापरण्याचे सुचविले.

 

परंतु हे दालन कामकाजाच्या व जनसंपर्काच्या दृष्टीने गैरसोईचे आहे. तसेच या अगोदर मुख्याधिकार्‍यांच्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावरून चुकीचे राजकारण सुरू असताना त्यांनी सूचित केलेली जागा ही सर्वररूमचा एक भाग आहे. सध्याचे नगरपालिकेमधील दोषारोपाचे वातावरण पाहता मुख्याधिकार्‍यांनी सुचविलेल्या सर्वररूममधील दालन स्वीकारल्यास नवीन वाद वाढून अजून खालच्या दर्जाचे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी सुचविलेले दालन आम्हास मान्य नसून आम्हास योग्य ते दालन द्यावे, अशी मागणी नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी मुख्याधिकार्‍यांंना दिलेल्या निवेदनात केली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी पालिकेच्या दारातच दालन थाटले.

 
यावेळी पक्षप्रतोद संजय फंड, सचिन गुजर, मुजफ्फर शेख, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्तार शहा, दिलीप नागरे, प्रकाश ढोकणे, नगरसेविका आशा रासकर, शकुंतलाताई डोळस, श्रीमती भारती परदेशी, जयश्री शेळके, मुन्ना पठाण, भाऊसाहेब डोळस, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, विजय शेळके, सिद्धार्थ फंड, बरकतअली शेख, रितेश रोटे, राहुल बागुल, राजेश जोंधळे, प्रतिक बोरावके, पंजाबराव भोसले, इम्रान बाली, नितीन क्षीरसागर, अमोल शेटे, बापू गारुडकर, सागर बर्वे, सुहास परदेशी, प्रताप गुजर आदी उपस्थित होते. यावेळी ससाणे समर्थकांनी पालिकेच्या दारात बसून दुपारी घोषणाबाजी केली. दरम्यान मुख्याधिकार्‍यांनी सांगितले की, मागणीच्या निवेदनाबाबत नगराध्यक्षांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

 

 मुख्याधिकार्‍यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेरा हलविण्याचे प्रकरण अद्याप मिटलेले नसताना काल उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना योग्य असे दालन किंवा केबिन दिली जात नाही म्हणून उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी पालिकेच्या दारातच बोर्ड लावून आपले दालन थाटले.

LEAVE A REPLY

*