कळंबू परिसरात तब्बल 26 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

0
कळंबू  / शहादा तालुक्यातील कळंबूसह सारंगखेडा येथे दि.9 जून रोजी दुपारी पाऊस झाला. पावसाची सुरूवात होताच वीज गुल झाली.
यामुळे परिसरातील नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. तब्बल 26 तासानंतर वीज वितरण कर्मचार्‍यांच्या परिश्रमाने वीजपुरवठा सुरळीत झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.9 जून रोजी सकाळपासून असहय्य उकाडा जाणवत होता. दुपारी 1 वाजता विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली.
पावसाचे आगमन होताच विजेचा लपंडावर सुरू झाला व वीजपुरवठा खंडीत झाला. वादळी पावसादरम्यान शहादा येथील 123 के.व्ही. तारा तुटल्याने विद्युत पोलही जमीनदोस्त झाले.

यामुळे कळंबूसह सारंगखेडा परिसरातील वीज खंडीत झाली. वीज सुरळीत करण्यासाठी लाईनमन यांनी दिवस-रात्र परिश्रम घेवून वीज दुसर्‍या दिवसी दि.10 रोजी 1.45 वाजता तब्बत 26 जासानंतर सुरळीत झाली.

यामुळे नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. संध्याकाळी मजूरवर्ग घरी परत आल्यावर त्यांना दळणासाठी पिठाची गिरणी बंद असल्याने खेडो-पाडी जावून दळून आणावे लागले.

तर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. तसेच दिवसभर असहय्य उकाडा त्यातच डासांच्या उपद्रवाने नागरीकांचे हाल झाले.

LEAVE A REPLY

*