कर चुकवण्यासाठी ‘प्रॉडक्शन्स’नी चुकीच्या पद्धतीचा वापर केला; कॅगचा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित अहवाल सादर

0
नियंत्रक व महालेखापरीक्षक (सीएजी) अर्थात कॅगने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित अहवाल शुक्रवारी संसदेत सादर केला.
यामध्ये सोहेल खान प्रॉडक्शन्स, सलमान खान व्हेंचर, अरबाज खान प्रॉडक्शन, शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा उल्लेख आहे.
या अहवालानुसार कर चुकवण्यासाठी या सर्वांनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आहे. नॉन थिएट्रिकल राइट्सना थिएट्रिकल म्हटले आहे.
विदेशातील शूटिंगसाठीचे पैसे विदेशातील कंपनीकडून देण्यात आले, नंतर त्याला निर्यात दाखवून कर भरला नाही. कर, व्याज किंवा सेस भरण्यात न अालेली व नियम तोडण्याची अशी १५६ प्रकरणे समोर आली आहेत. स्पॉन्सरशिप सेवेमध्येही चुकीच्या पद्धतीने सेन व्हॅट क्रेडिट घेण्यात आले. एकूण ४८.१३ कोटी रुपयांचे कर क्रेडिट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे. कर विभागाच्या पातळीवर रिटर्न फायलिंगचे नियंत्रण, रिटर्नची स्क्रुटिनी, कारणे दाखवा नोटीस या प्रक्रियेतच त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
सेवेला निर्यात दाखवून कर भरला नाही  
विदेशी कंपन्यांसोबत सेवा मिळवणाऱ्याप्रमाणे करार करण्यात आले. या पद्धतीने सेवेला चुकीच्या पद्धतीने निर्यात दाखवून कर वाचवण्यात आला.
चित्रपट “ऐ दिल है मुश्किल’ची शूटिंग भारत आणि न्यूयॉर्कमध्ये झाली होती. विदेशात शूटिंगसाठी अभिनेता रणबीर कपूरला यूकेमधील कंपनीकडून ६.७५ कोटी रुपये मिळाले. याला निर्यात दाखवून ८३.४३ लाख रुपयांचा कर भरण्यात आला नाही. याचप्रमाणे तेलगू चित्रपटाच्या अभिनेत्यानेही १.१० कोटी रुपये भरले नाहीत.

LEAVE A REPLY

*