कर्नाटकमध्येही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा

0
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांनी जिल्हा बँकांकडून घेतलेले ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे.
बुधवारी ही घोषणा करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपशासित राज्यांमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने ही कर्जमाफी जाहीर केली.
विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सहकारी बँकांकडून राज्यातील २२,२७,५०० शेतकऱ्यांनी घेतलेले प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.
कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असून कर्जमाफीसाठी राज्य सरकारवर प्रचंड दबाव होता.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही यासाठी सिद्धरामय्या यांना शेतकऱ्यांना मदत करावी म्हणून आवाहन केले होते.

LEAVE A REPLY

*